अंतराळातून पृथ्वीवर फैलावतोय एलियन व्हायरस; मानवासाठी अत्यंत धोकादायक?

Rare Alien Like Viruses : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत होते. जग आता कुठे कोरोना व्हायरसपासून सावरले असतानाच आता एलियन व्हायरस आणि बॅक्टेरिया चर्चेत आला आहे. हा एलियन व्हायरस  मानवासाठी अत्यंत धोकादायक असून तो शरीरातील मांस खात असल्याची माहिती समोर आली आहे. 

अमेरिकेत तिघांचा मृत्यू

अमेरिकेत व्हिब्रिओ व्हल्निफिकस नावाच्या बॅक्टेरियामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन लोकांना समुद्रात पोहल्यानंतर 
या बॅक्टेरिया संसर्ग झाला होता. तर, तिसऱ्या मृत व्यक्तीने कच्चे सीफूड खाल्ले होते. संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांत यांचा मृत्यू झाल्यामुळे जेथे हे मृत्यू झाले तेथे समुद्रात पोहणे आणि समुद्री खाद्यपदार्था खाण्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला. 

जीवघेणा संसर्ग

या बॅक्टेरियाला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस असेही म्हणतात. शरीरावर जखम झाली असेल त्या जखमेतून हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो आणि मग संपूर्ण शरीर पोखरुन काढतो. हा बॅक्टेरिया शरीरातील मांस खातो. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार हे मिठाच्या पाण्यात आढळणारे बॅक्टेरिया आहेत. ज्यांना याचा संसर्ग होतो त्यांच्या जगण्याची शक्यता फारच कमी असते.

हेही वाचा :  विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

याला एलियन व्हायरस का म्हणतात?

स्पॅनिश पर्वतरांगांमधील सिएरा नेवाडा येथे संशोधनादरम्यान अशा प्रकारचे व्हायरस आढळून आले होते. या संशोधनात कॅनडा, स्पेन आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा समावेश होता. सॅन दिएगो विद्यापीठातही सहभागी झाले होते.  पर्वतांच्या प्रत्येक चौरस मीटरवर 800 दशलक्ष विषाणू दिसले होते. उंच आणि निर्मनुष्य पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारचे व्हायरस सापडल्याने संशोधक हैराण झाले. यामुळे हा व्हायरस अवकाशातून फैलावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याला पॅनस्पर्मिया म्हणतात. संपूर्ण अवकाशात जीवसृष्टी आहे. अवकाशातील धूळ, लघुग्रह, धूमकेतू यांच्या माध्यमातून इकडून तिकडे पसरत राहते. यामुळेच हा एलियन व्हायरस पृथ्वीर आल्याचा काही संशोधकांचा दावा आहे. 

एलियन व्हायरस पृथ्वीवर कसा पोहचला

पॅनस्पर्मियाच्या या सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांचा विश्वास नाही. मात्र, याबाबत अनेक दावे केले जातात. 2020 मध्ये, मल्टीडिसिप्लिनरी जर्नल ऑफ मायक्रोबियल इकोलॉजी ऑफ नेचर कम्युनिकेशन्सने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्यात अशा प्रकारचे दावे आहेत. उंच पर्वतांच्या प्रत्येक लहान भागावर लाखो व्हायरस आहेक. एलियन व्हायरस पृथ्वीवर आल्यानंतर  अटलांटिक महासागरात पोहचले यानंतर ते सहारा वाळवंटातून पर्वतरांगामध्ये पोहचल्याचा दावा शोधनिबंधात करण्यात आला आहे. मात्र, हा एलियन व्हायरस पृथ्वीवरील मानवासाठी किती धोकादायक हे याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात आलेला नाही.  

हेही वाचा :  सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …