Viral Video : संतापजनक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचाराचा प्रयत्न

Crime News : भय इथले संपत नाही! एक भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सहा जणांनी एका अल्पवयीन मुलीला घरातून पळवून नेलं. त्यानतंर तिच्यावर ऑन कॅमेरा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही धक्कादायक घटना आहे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहरातील. (6 youth Sexual Assault girl video viral Uttar Pradesh jaunpur crime news in marathi)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार जण मुलीवर सामूहिक लैंगिक शोषण करताना दिसत आहे. हे सगळं त्यापैकी एका नराधम आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता. पीडित मुलगी त्यांचा तावडीतून निसटण्यासाठी जीवाच्या आकार्ताने प्रयत्न करताना दिसत आहे. पण नराधम तिला शारीरिक हल्ला करत त्याच्यासोबत दुष्कर्म करत होते. आरडाओरड करत अखेर पीडित मुलीला स्वत:ची सुटका करुन घेण्यात यश आलं. 

कशीबशी स्वत:ची सुटका करत तिने घटनास्थळावरुन पळ काढला.  मुलीच्या आरडाओरडामुळे आजूबाजूचे लोक त्यांची धरपडक करतील म्हणून त्यांनीही घटनास्थळावरून पळ काढला. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. नराधमांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी सर्व आरोपींना गजाआड केलं आहे. त्यांच्याविरोघात रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच रिक्षाचालकाने एकीला गेलं गायब

धक्कादायक म्हणजे ही घटना 14 ऑगस्टच्या रात्रीची आहे. जिथे आपण दुसऱ्या दिवशी स्वंतत्र्य भारत आणि देशाचा अभिमानाचे गोडवी गात होतो. तिथे याच देशाची एक लेक या नराधमाच्या अत्याचाराला तोंड देत होती. दिवसेंदिवस मुलीवरील अत्याचाराचा घटनांमध्ये वाढ होत आहे. 

दुसरीकडे मुंबईतही एका 12 वर्षींय अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …