VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात ओढली गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने तिथे उपस्थित एका व्यक्तीने धाडस करत समुद्रात उडी मारली आणि मुलीला वाचवलं. 

अतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी…; Viral VIDEO

 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं समुद्रकिनारी असणाऱ्या पायऱ्यांवर खेळताना दिसत आहेत. यावेळी समुद्र खवळलेला दिसत असून, लाटाही उसळत होत्या. मात्र असं असतानाही मुलं आपला जीव धोक्यात घालत पुढे जाऊन खेळत होती. दरम्यान, यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण सुटलं आणि रेलिंगमधून ती खाली पडली. 

The North Devon Council ने हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. यावेळी त्यांनी भरती-ओहोटीचा सामना करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. “समुद्राची परिस्थिती सतत बदलणारी आणि अस्थिर असू शकते. त्यामुळे कृपया किनारपट्टीवर लक्ष द्या,” असं काऊन्सिलने सांगितलं आहे. 

“ही घटना गुरुवारी संध्याकाळी इल्फ्राकॉम्बे हार्बर येथे घडली. जर काही नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नसता तर मोठी गंभीर घटना घडली असती,” असंही त्यांनी सांगितलं आहे. 3 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता भरतीच्या वेळी ही घटना घडली होती. 

हेही वाचा :  यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

दरम्यान सुदैवाने तिथे खेळणारी मुलं जखमी झाली नाहीत. काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, “सुदैवाने, यात सहभागी झालेल्यांना फक्त किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर Ilfracombe RNLI द्वारे उपचार केले गेले आहेत. अस्थिर परिस्थितीत स्लिपवेच्या आसपास खेळणं धोकादायक असू शकतं. आम्ही लोकांना बंदरावर सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन करतो”. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …