सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; ‘त्या’ वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक

अरुण म्हेत्रे, झी मीडिया

Pune Professor Controversial Statement: हिंदू देव-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. प्रा अशोक ढोले असं त्याचे नाव असून डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा ढाला याला अटक करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली होती. त्यानंतर अखेर आज डेक्कन पोलिसांनी कलम 295 अ अंतर्गत कारवाई केली आहे. 

पुण्यातील प्रतिष्ठित अशा सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी हिंदू देवतांचा अवमान केल्याचा आरोप आहे. नावेत बसून प्रवासाला निघालेले हिंदू दाम्पत्य संकटात सापडते त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणताही देव धावून येत नाही. या उलट मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या मदतीला त्यांचे देव धावून येतात आणि त्यांचा जीव वाचवतात, अशा आशयाचं विधान प्राध्यापक ढोले यांनी केले होते. 

विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना त्यांनी हे विधान केले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही. हिंदुत्ववादी संघटनांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर पुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता. 

हेही वाचा :  ‘परी म्हणू की सुंदरा’, साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, गुढीपाडव्याला करा असा लुक

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक अशोक ढोले यांना सिम्बॉयसिसच्या व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आलं आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

दरम्यान, प्राध्यापक ढाले यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तर, अशोक ढोले यांना अटक करण्याबाबतचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …