नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा


मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

आमदार नितेश राणेही याप्रकरणी सहआरोपी आहेत. लवकरच पोलीस दोघांचा जबाब नोंदवणार आहेत.

 दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी  दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. १९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.

या विधानाला त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दुजोरा देत  समाजमाध्यमांवर दिशाच्या मृत्यूविषयी बदनामीकारक संदेश प्रसारित केला.  ही पत्रकार परिषद दिशाचे आई-वडील वासंती आणि सतीश सालियन यांनी पाहिली होती.

त्यांच्या या विधानामुळे दिशासह सालियन कुटुंबीयांची  बदनामी झाली असून लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे वासंती सालियन यांनी मालवणी पोलिसांत नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली . या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत घेत राणे पिता-पुत्राविरुद्ध  माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :  "निर्भया फंडांतून घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी"; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

The post नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …