फेब्रुवारी 29, 2024

‘त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का’ आता तरी म्हणू नका, ‘पैसे न देता चलेजाव’

ठाणे : मुंबई आणि ठाण्यात वडापाव (Vada Pav) आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्यावेळी तुमच्या मागे कामाची, सभासमारंभाची लगबग असेल, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना पटकन शांत करण्यासाठी वडापाव धावून येतो. नाक्यावर जो मिळेल तो…त्यातही तो त्या भागातला प्रसिद्ध वडापाव असला, तर ढेकर देईपर्यंत नाही म्हणायचं नाही. (railway minister ashwini vaishnaw eaten vada pav and bill pay bjp local leader at thane)    

पण गडबडीत, मी नाही तर तो देईल, याने नाही तर त्याने दिले असतील…अशा गडबडीत दुकानदाराचे पैसे कुणीच दिले नाहीत तर… दुकानदार पावाला नाही, जिभेला चटणी लावून बोलतोय की काय असं वाटतं?

असाच एक प्रकार ठाण्यात घडलाये, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि इतर मंत्र्यांनी शुक्रवारी (18 फेब्रुवारी) ठाण्यात वडापाव, भजीपाव यावर यथेच्छ ताव मारला आणि अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले, मग काय ?  त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यानी ही ताव मारला, पण एवढे सगळे झाल्यावर बिल न देताच हे मंत्री, नेते आणि कार्यकर्ते तिथून निघून गेले.

हेही वाचा :  Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? काही तासांवर फैसला

ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला आणि त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर त्यांनी वडा पावावर ताव मारला.

मात्र शेकडो वडापाव आणि अनेक भजी पोटभर खाल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते बिल न देताच निघून गेले. मग तेथील व्हिडीओ आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि विरोधकांना आयता मुद्दा मिळाला. 

त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी जाऊन बिल भरले आणि यानंतर आम्ही पैसे दिले असल्याचे सांगितले. पण तोपर्यंत प्रकरण थंड झालं होतं वडापावासारखं.. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

Nilesh Rane Pune : माजी खासदार निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे. …

LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी ‘या’ नावाला दिली भरभरुन मतं

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला …