वडील फेरीवाले, आई कामगार; आता मुलीचे अंगावर खाकी चढवण्याचे स्वप्न पूर्ण, बनली PSI | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

PSI Success Story : जिद्द आणि चिकाटी असली तर यश आपल्या पदरात येऊन पडत. त्यासाठी तयारी असली पाहिजे फक्त मेहनत करण्याची. अशीच कठोर मेहनत घेतली कानळद्याच्या कोमल शिंदे या तरुणीने. कोमल ने कुठल्याही प्रकारचं कारण न देता कठोर मेहनत घेतली आणि PSI झाली. वडील फेरीवाले, दुचाकीवरून गावागावात जाऊन कपडे विकतात, तर आई एका कंपनीत कामगार म्हणून काम करते. मात्र या कष्टकरी दाम्पत्याच्या लेकीने परिस्थितीची जाणीव ठेवत अशा परिस्थितीमध्ये देखील कोमल निराश न होता किंवा खचून न जाता निरंतर अभ्यास करत राहिली. अगदी प्रतिकूल परिस्थितीत कोमलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

जळगाव येथील कानळदा रोड भागातील राजाराम नगर भागात वास्तव्य असणाऱ्या कोमल शिंदे या मुलीने जिद्द व चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलं.

यशाला हजार नातेवाईक असतात, अपयश मात्र अनाथ असतं. कोमलने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे. आज अनेक नवोदित अभ्यास करण्याऱ्या मुलांसाठी कोमल एक प्रेरणा म्हणून उभी आहे. अतिशय बिकट परिस्थितीतुन वाट काढत कोमलने यशाला गवसणी घातली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. काही दिवसांपूर्वी एकच खोली असलेल्या भाड्याच्या घरात सुद्धा कोमलच्या परिवाराने दिवस काढले. या घरात शौचालय सुद्धा नव्हते, मात्र हीच परिस्थिती कोमलची ताकद बनली. काही दिवसांनी आई वडिलांनी जमविलेल्या पैशातून वन रुम किचनचे नवीन घर घेतले. मात्र पोरांसाठी आई वडिलांचे कष्ट सुरूच होते.

कोमल आठवी ते नववीच्या वर्गात शिकत असताना कोमलच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून एक महिला पोलीस अधिकारी आल्या होत्या. या महिला पोलीस अधिकाऱ्याला पाहून कोमलने सुद्धा आपणही पोलीस अधिकारीच व्हायचं, अंगावर वर्दी चढवायची हे स्वप्न बघितलं. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा प्रवास सुरू झाला. कोमल हिने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर एम एस डब्ल्यू पूर्ण करत तीच पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण झालं आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 09 डिसेंबर 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकाच मार्गदर्शन, खाजगी क्लास लावणं कोमलला आवश्यक वाटलं मात्र त्यासाठी गरज होती ती पैशांची आणि तीच मोठी कोमलची अडचण होती. क्लास लावण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट कोमलचे ट्रक चालक मामा मुकेश सपके यांना कळाली. आपण शिकलो नाही मात्र भाचीसाठी कुठे कमी पडायचं नाही, भाचीने मोठ व्हावं म्हणून मामा कामात पडला. मामाने कोमल हिला पैशाची मदत केली. त्यानंतर कोमल हिने 2019 मध्ये जळगावातील युनिक ऍकॅडमी मध्ये क्लास लावला. आणि तिची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तयारी सुरू केली.

चार ते पाच महिन्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात निघाली. प्रचंड आत्मविश्वास असलेल्या कोमलने अर्ज भरला. परीक्षा दिली मात्र काही चुकांमुळे कोमलला पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. कोमलने पुढे प्रचंड मेहनत घेतली, जिद्दीने अभ्यास केला. मैदानी सराव सुद्धा केला. २०२० मध्ये कोमल हिने पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरला मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आले २०२१ मध्ये सुद्धा ही परीक्षा झाली नाही. २०२२ साली संधी वाया घालवायची नाही म्हणून तब्बल दहा ते बारा तास सलग कोमलने अभ्यासिकेत तसेच घरी रात्रंदिवस अभ्यास केला. कोमलने पूर्ण तयारीने आणि मेहनतीने अभ्यास करून ही परीक्षा दिली होती. आणि कोमलची मेहनत फळाला आली. ती पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर मुलाखत व मैदानी चाचणीचा टप्पा सुद्धा कोमलने यशस्वीरित्या पार केला. आणि अखेर अंगावर वर्दी चढवून पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

नुकताच चार जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. याच दिवशी कोमलचा वाढदिवस असतो. एकीकडे वाढदिवस आणि दुसरीकडे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण असा दुहेरी आनंदाचा दिवस शिंदे कुटुंबात पार पडला. आपली पोरगी अधिकारी झाली हे ऐकून तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता. जेव्हा खरं काय ते कळलं, तेव्हा मात्र आई वडील दोघांच्या दोन्ही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते.

तब्बल दोन ते तीन तास कोमल ही खरोखर अधिकारी झाल्याच्या आनंदात तिचे आई वडील हे रडतच होते. नेमकं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय हे सुद्धा कोमलच्या वडिलांना माहित नाही. त्यांना कोणी विचारायचे की मुलगी काय करते. तर त्यांना एमपीएससी माहित नाही म्हणून ती एमएससीआयटी करते असं सांगायचे, आपण शिकलो नाही पण मुलींनी शिकावं, तिची स्वप्नं पूर्ण करावं असं कोमलच्या वडिलांचं आणि आईचं देखील स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांची धडपड सुरू होती. मात्र कोमलनेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली. पोलीस उपनिरीक्षक होऊन कोमलने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. कोमलच्या यशाचं परिसरातील रहिवाशांनाही मोठं कौतुक आहे. आपल्या गल्लीत राहणारी कोमल पोलीस उपनिरीक्षक झाल्याच्या आनंदात रहिवाशांनी तिची परिसरात घोड्यावर बसून भव्य अशी मिरवणूक काढली.

हेही वाचा :  घरची परिस्थिती बेताची.. कुठलाही क्लास न लावता हर्षल बनला सेल टॅक्स इन्स्पेक्टर

नुकताच चार जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. याच दिवशी कोमलचा वाढदिवस असतो. एकीकडे वाढदिवस आणि दुसरीकडे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण असा दुहेरी आनंदाचा दिवस शिंदे कुटुंबात पार पडला. आपली पोरगी अधिकारी झाली हे ऐकून तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता. जेव्हा खरं काय ते कळलं, तेव्हा मात्र आई वडील दोघांच्या दोन्ही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते.

तब्बल दोन ते तीन तास कोमल ही खरोखर अधिकारी झाल्याच्या आनंदात तिचे आई वडील हे रडतच होते. असं कोमल सांगते. नेमकं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय हे सुद्धा कोमलच्या वडिलांना माहित नाही. त्यांना कोणी विचारायचे की मुलगी काय करते. तर त्यांना एमपीएससी माहित नाही म्हणून ती एमएससीआयटी करते असं सांगायचे, आपण शिकलो नाही पण मुलींनी शिकावं, तिची स्वप्नं पूर्ण करावं असं कोमलच्या वडिलांचं आणि आईचं देखील स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांची धडपड सुरू होती. मात्र कोमलनेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली. पोलीस उपनिरीक्षक होऊन कोमलने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. कोमलच्या यशाचं परिसरातील रहिवाशांनाही मोठं कौतुक आहे. आपल्या गल्लीत राहणारी कोमल पोलीस उपनिरीक्षक झाल्याच्या आनंदात रहिवाशांनी तिची परिसरात घोड्यावर बसून भव्य अशी मिरवणूक काढली.

हेही वाचा :  कृषि विज्ञान केंद्र, जालना येथे विविध पदांची भरती, 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

कोमलने या परीक्षेसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. जसं की मोबाईल व्हॉट्सअप या गोष्टींपासून तब्बल चार वर्षे कोमल ही लांब होती. इतर मुलींना हौस मौज करताना पाहून कोमलच्या आईला अनेकदा रडायला यायचं. मात्र तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे, मोठे व्हावं यासाठी तिचा निर्णय बरोबर होता. आहे त्या परिस्थितीत कोमलने जे यश मिळवलं आहे. त्याचा मोठा अभिमान कोमलच्या आई-वडिलांना आहे. कोमल ही तिच्या कुटुंबातील पहिलीच शासकीय अधिकारी आहे. मुलगी ओझं नसते, एखाद्या मुलाप्रमाणे आमच्या मुलीने कुळाचं आणि आमचं नाव रोशन केलं आहे. कोमलचा मोठा गर्व आहे, तिच्या यशाचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही ,असं कोमलची आई भारती शिंदे तसेच वडील सोपान शिंदे सांगतात.

“आई-वडिलांचे कष्ट बघून खूप त्रास होत होता. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जिद्द मनात होती त्यासाठीच पोलीस उपनिरीक्षक पदाचं स्वप्न बघितलं. आज मी हे स्वप्न पूर्ण करू शकले, त्याचा मला मोठा आनंद आणि समाधान आहे. जेवढे आई-वडिलांनी कष्ट केले. त्यापेक्षाही दुप्पट त्यांना मला आनंद द्यायचा आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशासनात चांगलं काम करेल. मला पाहून समाजात कोणालातरी प्रेरणा मिळेल आणि अधिकारी व्हावंसं वाटेल असं काम मला करायचं आहे. परिस्थिती आणि आलेल्या संकटांवर मात करत प्रचंड जिद्दीने अभ्यास करत कोमलने जे यश मिळवलं आहे, ते नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे, यात शंका नाही.” – कोमल शिंदे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या लेकीने मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद !

MPSC PSI Success Story : खरंतर एमपीएससी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं, ही काही सोपी …

स्वप्न बघितले आणि ते सत्यात साकार केले ; IFS अधिकारी गहाना नव्या जेम्सची यशोगाथा !

UPSC IFS Success Story : काहींना आयएएस होण्याचे स्वप्न असते, त्यापैकी काहींना आयएफएस होण्याचे तर …