मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला “ज्याने चूक केली, त्याला…”

Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन मध्य प्रदेश सरकारवर (Madhya radesh Government) सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं आहे की, ही घटना 2020 मधील आहे. त्यावेळी मी दुकानाबाहेर बसलो होते. तेव्हा आरोपी प्रवेश शुक्ला धुम्रपान करत माझ्याजवळ आला आणि माझ्यावर लघुशंका केली. त्यावेळी मी त्याचा चेहरा पाहू शकलो नव्हतो. 

दशरम याने पुढे सांगितलं की, व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. तेव्हा मला यासंबंधी माहिती मिळाली. मी तर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात बोलावून व्हिडीओबद्दल सांगितलं. त्यामुळेच मी लघुशंका करणारी व्यक्ती प्रवेश शुक्ला असल्याचं माहिती नव्हतं असं सांगत होतो. 

दशरमने सांगितलं की, 4-5 जुलैच्या रात्री 12 वाजता त्याला सिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणण्यात आलं. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला मुख्यमंत्र्यांनी भोपाळला बोलावलं असल्याचं सांगितलं. मी भोपाळला जाण्याआधी कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.  पण तिथे फार गर्दी असल्याने मी भेटू शकलो नाही. 

हेही वाचा :  विश्लेषण : गोव्यात बहुमताचा मार्ग खडतर

“ज्याने चूक केली, त्याला शिक्षा मिळाली”

दरम्यान, दशमतला याप्रकरणी जबाब देणार का? असं विचारण्यात आलं असता त्याने उत्तर दिलं की “आता काय जबाब देणार? ज्याने चूक केली त्याला शिक्षा मिळाली आहे”. दरम्यान, सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवर दशमतने माहिती दिली की, त्याला दोन चेक मिळाले आहेत. यामधील एक चेक साडे सहा तर दुसरा दीड लाखाचा आहे.  

“फसवणूक करत घेतल्या सह्या”

 दशमतचं म्हणणं आहे की, त्याचं जास्त शिक्षण झालेलं नाही. जो स्टॅम्प पेपर समोर आला आहे त्यावर चुकीच्या पद्धतीने आमच्या सह्या घेण्यात आल्या. पीडित दशमत रावत याचं एक शपथपत्र समोर आलं होतं, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. पण हे पत्र खोटं असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

नेमकं काय झालं?

करौंदी गावात राहणाऱ्या 36 वर्षीय दशमत रावतवर त्याच्या गावात राहणाऱ्या प्रवेश शुक्लाने लघुशंका केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. 5 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली.  

हेही वाचा :  4 मे रोजी महिलांना विवस्त्र फिरवलं, 49 दिवसांनंतर FIR, 78 दिवसानंतर अटक का? मणिपूरचा संपूर्ण घटनाक्रम

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …