पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम


३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला आज मध्यरात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील फुल मॅराथॉन पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक कालिदास हिरवे, द्वितीय राहुल कुमार पाल आणि तृतीय अनिल कुमार सिंग यांनी मिळविला. तर महिलामध्ये फुल मॅराथॉन प्रथम क्रमांक ज्योती गावते, द्वितीय क्रमांक मनीषा जोशी आणि तृतीय प्रीती लाला यांनी मिळविला आहे.

करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून इतर स्पर्धा प्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा देखील होऊ शकली नाही. पण यंदा करोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने, ही स्पर्धा घेण्याचे नियोजन आयोजकांनी केले. ही स्पर्धा ३५ व्या वर्षात पदार्पण करीत असताना, यंदा प्रथमच मध्यरात्री ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेला खेळाडूंनी चांगलच प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षिस वितरण काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक अभय छाजेड यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीची उपस्थित होती.

यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की, करोना महामारीमुळे मागील दोन वर्षात ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष होते. आपण महामारीमधून बाहेर पडत असून आजवर पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पहाटेच्या सुमारास होत होती. मात्र यंदा प्रथमच मध्यरात्री या स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यामुळे वाहतुकीचा कोणत्याही प्रकाराचा प्रश्न निर्माण झाला नाही. ही कल्पना अशीच पुढे चालूच ठेवावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :  Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार – विश्वजीत कदम

मराठी भाषा ही राष्ट्रीय स्तरावर अंत्यत महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि आपल्या साहित्यिकांनी लिहिलेल्या अनेक कांदबार्‍या, या सर्वांमुळे मराठी भाषेला जागतिक पातळीवर दर्जा मिळाला आहे. तर आज मराठी भाषा दिन जगात साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आणि ते आम्ही मिळविणार, असं विश्वजीत कदम म्हणाले.

The post पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …