Bank Holidays in March 2022: महाराष्ट्रात मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; २३ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी


बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण मार्च महिन्यात महाराष्ट्रात आठ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. करोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

सुट्ट्यांची यादी

१ मार्च: महाशिवरात्रीमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.

६ मार्च: रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

१२ मार्च: दुसरा शनिवार

१३ मार्च: रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील.

हेही वाचा :  Viral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?

१८ मार्च: धुळीवंदन असल्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद असतील.

२० मार्च: रविवार असल्याने सुट्टी आहे.

२६ मार्च: चौथा शनिवार

२७ मार्च: रविवार असल्याने बँका बंद असतील.

The post Bank Holidays in March 2022: महाराष्ट्रात मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; २३ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …