बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात

Bhopal Crime: चोरी करण्याच्या नादात चोर कोणत्या थराला पोहोचतील हे सांगता येत नाही. चोरी यशस्वी व्हावी, आपण पकडले जाऊ नये यासाठी चोर काहीही करायला सज्ज असतात. असाच एक प्रकार भोपाळच्या बेरासिया येथे झाला आहे. या घटनेत मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. जंगलात शेळ्या चरायला गेलेला हा मेंढपाळ अवघ्या १६ वर्षांचा होता. 

ललारिया गावातील रहिवासी 16 वर्षीय जुबेर आरिफ खान शेळ्या पाळायचा. तो रोज सकाळी शेळ्या चरायला जंगलात जात असे. रविवारी सकाळी 10 वाजता तो शेळ्यांसह जंगलात गेला. पण सायंकाळी सहा वाजले तरी आरिफ घरी आला नाही. तो घरी न परतल्याने नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. 

यादरम्यान ललारिया आणि सानोदा गावांच्या हद्दीतील नदीत झुबेरचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात मागच्या बाजूला धारदार शस्त्राने वार करून कोणीतरी त्याचा खून केला होता. तसेच मृतदेह नदीत फेकून देण्यात आल्याची माहिती बैरसिया ठाण्याचे प्रभारी गिरीश त्रिपाठी यांनी दिली. शेळ्या गायब झाल्यामुळे बकऱ्या चोरण्याच्या उद्देशाने जुबेरचा खून झाल्याचा अंदाज सुरुवातीला पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा :  लव्ह, सेक्स अन् धोका! एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स...; नात्याला काळिमा फासणारा प्रकार

मेंढपाळाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना  बेरासिया येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नात्यातील भावोजी- मेहुण्यासह पाच जणांना अटक केली आहे. घटनेनंतर खोलीत लपवून ठेवलेल्या बकऱ्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

बकऱ्या चोरण्यासाठी मागवले पिकअप वाहन 

घटनेपूर्वी झुबेर हा लालरिया येथील 19 वर्षीय राजा शाह आणि सलमान उर्फ ​​शोएब यांच्यासोबत दिसला होता. पोलिसांनी संशयाच्या आधारे दोघांची चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. शोएब हा भोपाळमधील नार्याकखेडा येथील रहिवासी असून ललारिया येथे त्याचे सासरचे घर आहे. शोएबने आपला मेहुणा राजा याच्यासोबत बकऱ्या चोरण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने फैज, आमिर आणि जाहिद यांना भोपाळहून पिकअप वाहन घेऊन बोलावले. इतर आरोपी साबोदरा नदीकडे शेळ्या चोरण्याच्या उद्देशाने आले होते. 

योजनेनुसार बकर्‍या चरत असलेल्या जुबेरला राजा आणि शोएब यांनी नदीकाठच्या एका निर्जन ठिकाणी बोलावले. यादरम्यान राजाने जुबेरची कुऱ्हाडीने हत्या केली. यानंतर शेळ्या पिकअप वाहनात टाकण्यात आल्या. शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..समोरून आली वानरसेना...पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न’

Pune Accident Case : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे …

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News Today: सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार …