पावसाळ्यात साप चावल्यास घाबरुन जाऊ नका, असा करा बचाव!

Snake Bite Treatment In Marathi: पावसाळा (Monsoon) येताच साप चावण्याचे प्रकार देखील वाढतात. पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. तर, मुसळधार पावसामुळं सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी जागेचा आडोसा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील अडगळीच्या खोलीत किंवा घराजवळच्या एखाद्या ठिकाणी आसरा शोधतात. अशावेळी अनावधनाने आपण तिथे जातो आणि साप डसतो. 

सर्पदंश झाल्यानंतर अनेक जण घाबरुन जातात. गावाकडे अजूनही साप चावल्यानंतर एखाद्या बुवा-बाबाकडे विष उतरवण्यासाठी नेण्यात येते. मात्र, या प्रकारामुळं एखाद्या व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो. साप चावल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार करावेत, याची माहिती घेऊया. 

सर्पदंशापासून बचाव कसा करावा?

सर्वप्रथम आपण सर्पदंशापासून कसा बचाव करावा, याची प्राथमिक माहिती जाणून घेऊया. ज्यांची घरं शेतात असतील आणि ते जमिनीवर झोपत असतील तर त्यांनी झोपण्यापूर्वी मच्छरदाणीचा वापर करावा. घराबाहेर पडताना लाँग-बूटचा वापर करावा. दगडाच्या खाली, खड्ड्यात साप असण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं अशा जागांवर कोणतीही छेडछाड करु नका. 

सर्पदंश झाल्यास काय करावे?

– सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. कारण जर तो व्यक्ती चालत-फिरत असेल तर विष शरीरात लवकर पसरते. 

हेही वाचा :  Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

– सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरवू नका त्याला हिंमत द्या. कारण घाबरल्यानंतर रक्तप्रवाह वाढतो अशाने शरिरात विष लवकर पसरते. 

– शरीराच्या ज्या ठिकाणी साप चावला आहे त्याच्यावर आणि खाली रक्तप्रवाह रोखण्यासाठी पट्टी बांधा

– सापाने ज्या ठिकाणी चावा घेतला आहे त्या जागेवर साबण आणि पाण्याच्या मदतीने धुवून घ्या 

– रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जा 

– रुग्णाला बेशुद्ध होऊन देऊ नका

– ज्या ठिकाणी सापाने दंश केला आहे तिथे चिरा लावू नका

– विष तोंडाने ओढण्याचा प्रयत्न करु नका 

– जिथे सर्पदंश झाला आहे त्याजागेवर कपडा, रस्सी अशाप्रकारचं काही बांधू नका

– दुखणं कमी करण्यासाठी पेन किलर किंवा दारुसारख्या गोष्टी देऊ नका

– जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्पदंश प्रतिबंधक लस असतात. त्यामुळं वेळ न दवडता प्राथमिक आरोग्य केंद्रात जा 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …