Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

First Indian intranasal COVID vaccine : येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला (26 January, Republic Day )देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे. (COVID vaccine) सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लस या इंजेक्शनद्वारे टोचून घ्याव्या लागत आहेत. (Covid Nasal Vaccine) पण भारत बायोटेकने देशात निर्माण केलेली इंट्रानेझल व्हॅक्सिन नाकावाटे घ्यायची आहे. (Coronavirus News)

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लस तयार करण्यात आली. त्यापुढे जाऊन ( Nasal Vaccine) नाकातून लस (नेझल स्प्रे) देण्यासाठीही संशोधन सुरु करण्यात आले. कोरोनाचं इंजेक्शन घेण्याची गरज पडू नये म्हणून नाकातून स्प्रे देण्यासाठी संशोधक(Covid Nasal Vaccine) कामाला लागले आहेत. याला यशही आले आहे. त्यामुळे  नेझल व्हॅक्सीन देशवासियांसाठी उलब्ध झाली आहे.

नेझल व्हॅक्सिन 18 वर्षांवरील व्यक्तींनाच

भारत बायोटेकच्या या ‘नेझल व्हॅक्सिन’साठी 23 डिसेंबरलाच केंद्राने परवानगी दिली होती. नाकावाटे घ्यायची ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात मिळणार आहे. तसेच भारत सरकारच्या कोविड लसीकरण मोहिमेतही तिचा समावेश झाला आहे. नाकात असलेल्या म्युकोसाद्वारे कोरोना आणि व्हायरल इन्फेक्शन होतात. नेझल व्हॅक्सिन थेट म्युकोसातच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. नेझल व्हॅक्सिन 18 वर्षांवरील व्यक्तींनाच घेण्याची परवानगी आहे. 

हेही वाचा :  रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील 'या' गोष्टी

भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी सांगितले की गुरांच्या त्वचेच्या त्वचेच्या रोगासाठी घरगुती लस, Lumpi-ProVacInd, पुढील महिन्यात लान्च होण्याची शक्यता आहे.

नेझल व्हॅक्सिन इतकी असेल किंमत

भारत बायोटेकला या महिन्याच्या सुरुवातीला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) देशात अनुनासिक लस विकण्यासाठी मान्यता मिळाली. ही लस CoWIN प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.  भारत बायोटेकने घोषणा केली होती की, ते nasal vaccine सरकारकडून 325 रुपये प्रति शॉट खरेदीसाठी देतील  आणि खासगी लसीकरण केंद्रांसाठी 800 रुपये प्रति शॉट विकतील.

नाकाद्वारे घेतलेली लस कशी कार्य करते?

नाकातील लसीचा डोस इंजेक्शनने न देता नाकातून दिला जातो. डोस थेट श्वासोच्छवासाच्या मार्गांमध्ये पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. विषाणू सामान्यत: नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि नाकाद्वारे घेतलेली लस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला रक्त आणि नाकामध्ये प्रथिने तयार करण्यास मदत करते जी विषाणूपासून बचाव करण्यास मदत करते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …