Viral Video: ‘पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला’

Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे. देशांची सीमा असो किंवा क्रिकेटचे मैदान, भारताकडून नेहमीच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. आर्थिक गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानची अवस्था बिकट होत चालली आहे. याचा तेथील जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे जनतेच्या त्यांच्या देशाप्रतीचा राग उफाळून येतोय. यातून भारताविरुद्ध पेरलेल्या द्वेशाबद्दल ते आपल्या राष्ट्राला दोष देत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या मित्र देशांना मदतीची विनंती करत आहेत. पाकिस्तानवर डिफॉल्टर होण्याचे संकट घोंघावत आहे. पाकिस्तानातील लोक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तळमळत आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये सरकारवर नाराजी आहे. अशावेळी भारताशी तुलना करणे निरुपयोगी असल्याचा सल्ला ते सरकारला देत आहेत. पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

पाकिस्तानी सेल्समन रिअल एंटरटेनमेंट टीव्ही नावाचा यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत. आजपर्यंत आपण भारताशी एकही युद्ध जिंकलेलो नाही. दुर्दैवाने आम्हाला पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकविला गेला, असे नागरिक मुलाखतीत सांगत आहेत. 

हेही वाचा :  पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...

पाकिस्तानने सध्या स्वतःच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे भारताच्या संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे योग्य आहे. देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरिक व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत. 

पाकिस्तानची प्रतिमा वाईट

पाकिस्तानच्या शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे एक व्यक्ती म्हणत असल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते. पाकिस्तानने आपल्या भावी पिढ्यांना इतिहासाची योग्य माहिती देणे गरजेचे आहे. भारत-पाकिस्तान सोडून इतरही मुद्दे आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत, असेही नागरिक सांगत आहेत.

आज पाकिस्तानची प्रतिमा जगात खूप खराब झाली आहे. यामागे काय कारण आहे ? आपण पाकिस्तानची चांगली प्रतिमा का निर्माण करू शकलो नाही? असा प्रश्नदेखील नागरिकांनाकडून पाकिस्तानच्या शासनकर्त्यांना विचारला जात आहे. 

भारतामुळे पाकिस्तानची स्थिती सुधारली असती

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबद्दल देखील या व्हिडीओमध्ये भाष्य करण्यात आले आहे. भारताकडे खूप मोठी बाजारपेठ आहे. तिथे सध्याच्या स्थितीत पाकिस्तानच्या एक-दोन गोष्टीदेखील चालल्या तरी आपल्याला फायदा होईल, पाकिस्तानची स्थिती सुधारेल आणि निम्मी बेरोजगारी अशीच दूर होईल, असा सल्ला दिला जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …