Weird Tradition : विचित्र! भारतात ‘या’ ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात

Weird Tradition :  प्रेम आणि विश्वासचं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं…या नात्यात जेव्हा कोणी तिसरा येतो हे कोणालाही मान्य नसतं. नवरा बायकोमध्ये कधी दुसरी महिला किंवा दुसरा पुरुष आल्यास त्यांचा नात्याला तडा जातो. कोणालाही आपला नवरा किंवा आपली बायकोही शेअर करायला मुळीच आवडणार नाही. ती व्यक्ती फक्त आपलीच आहे आपला तिच्यावर हक्क आहे. पण या नात्यावर दुसरा कोणी हक्क गाजवायला येतो तेव्हा आयुष्यात एक वेगळाच भूकंप येतो. 

महाभारतात आपण द्रौपदीचा विवाह हा पांडवांशी झाला होता. म्हणजे द्रौपदी ही पाच भावांची बायको होती. ही झाली अतिशय पुरातन काळातील गोष्ट…पण आजही ही प्रथा भारतातील एका प्रदेशात पाळली जाते. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही विचित्र प्रथा जी द्रौपदी परंपरा नावाने ओळखली जाते, ती आजही सुरु आहे. इथे एका महिलेच पाच कधी कधी तर सात भावांशी लग्न केलं जातं. विशेष म्हणजे हे सर्व जण आनंदाने जगतात. (Draupadi Tradition in Kinnaur Himachal)

हेही वाचा :  मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

कुठे आहे ही परंपरा?

हिमाचल प्रदेशातील किन्नौर या गावात ही प्रथा आजही सुरु आहे. प्रत्येक समाजाप्रणाने इथेही अनेक प्रथा पाळल्या जातात. यापैकी बहुपत्नीत्वाला इथे सामाजिक मान्यता देखील आहे. हिमालच प्रदेशासोबतच उत्तराखंडमधील आदिवासी भागात ही प्रथा पाळली जाते. 

बंद दरवाजाबाहेर ‘ती’ टोपी

या प्रथेनुसार ही महिला एकापेक्षा जास्त पतींसोबत एकाच घराच्या छताखाली सुखाने संसार करतातच. जर या पतीपैकी कोणाला बायकोसोबत एकांत हवा असेल तर तो खोलीचा दरवाजा बंद करतो आणि आपली टोपी दाराबाहेर ठेवतो. यावरुन दुसरा नवरा त्या खोलीमध्ये जात नाही. 

ही व्यक्ती असते कुटुंबप्रमुख 

या विचित्र परंपरेमध्ये संसाराची प्रमुख ही पत्नी असते. तिला या परंपरेनुसार गोयने आणि तिच्या मोठ्या नवऱ्याला गोरियस असं म्हणतात.  (one woman marry with many men wife has physical relations with 5 husband Draupadi Tradition at Kinnaur Himachal Pradesh ajab gajab news)

आजही का पाळली जाते परंपरा?

इथल्या लोकांचं म्हणं आहे ही परंपरा महाभारत काळापासून सुरू आहे. ही प्रथा सुरु होण्यामागे कारण म्हणजे पांडवांनी वनवासात येथे वेळ घालवला होता. वधूचं वेळेचं योग्य नियोजन केल्यामुळे या प्रथेमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम दिसतं नाही असं या लोकांचं म्हणं आहे. तर या लग्नानंतर जी मुलं होतात ती कायदेशीर वडिलांना वडील म्हणतात. इतरांना मोठे बाबा, धाकटा बाबा असं म्हणतात. जर मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर या घरात मालमत्तेची विभागणी होतं नाही. त्यामुळे घरात सुख समृद्धी अबाधीत राहते. 

हेही वाचा :  विश्लेषण : देशाच्या रक्षणासाठी युक्रेनचे खेळाडू रणभूमीवर!

महिलेचं म्हणं आहे की, या प्रथेमध्ये त्या खूप जास्त आनंदी राहतात. जेव्हा एखाद्या पतीचं निधन होतं, त्यांना दु:ख होतं. पण नवऱ्याच्या जाण्यानंतरचे येणारे संकट त्यांच्यावर येतं नाही. कारण इतर पती त्यांची रक्षा करण्यासाठी असतात. हिमाचल प्रदेश असल्याने शरीराला उष्णता मिळावी म्हणून इथे जेवणासोबत सर्रास दारु प्यायली जाते. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …