Weather Updates : कसला वीकेंड अन् कसलं काय! पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सध्या सुरु असणारा पाऊस मान्सून आहे असा समज जर तुमचाही झाला असेल तर तसं नाहीये. कारण, केरळात मान्सून दाखल झाला असला तरीही अद्यापही त्यानं महाराष्ट्राचं दार ठोठावलेलं नाही. उलटपक्षी मान्सून राहिला दूर, इथं महाराष्ट्रात तर, हवामानशास्त्र विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

तिथे अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ चक्रिवादळामुळं किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा आणि काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेल असताना राज्याचे काही जिल्हे मात्र उन्हामुळं होरपळून निघणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं पुढचे पाच दिवस आणि पर्यायी Weekend सुद्धा घामाच्या धारांनी हैराण होण्यातच जाणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा? 

अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. असं असलं तरीही सकाळच्या वेळी असणारा उन्हाचा दाह मात्र नागरिकांना हैराण करणारा असेल. त्यामुळं घराबाहेर पडण्यापूर्वी उन्हापासून बचाव करता येईल असे उपाय योजूनच बाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

IMD च्या वृत्तानुसार देशाचा मध्य भाग आणि महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होण्यास काहीसा विलंब असला तरीही त्यापूर्वी तापमानाच लक्षणीय वाढीची नोंद केली जाऊ शकते. किनारपट्टी भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाचा दाह अंगाची काहिली करणार आहे. तिथे कोकण पट्टा मात्र अपवाद ठरेल, कारण हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी असेल. 

वादळ, वारा आणि मान्सून… 

अरबी समुद्रालगत असणाऱ्या किनारपट्टी भागावर सध्या वादळाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे.  वेळोवेळी हे वादळ अधिकाधिक रौद्र रुप धारण करत असल्यामुळं सध्या सावधगिरीचा इशारा म्हणून मासेमारांनाही खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर केरळाच्या दिशेनं येणाऱ्या मान्सूनचाही वेग वाढल्यामुळे या वादळी वाऱ्यांची टक्कर मान्सूनशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात येत्या काही दिवसांच हवामानाची विचित्र रुपं पाहायला मिळणार आहेत. 

हेही वाचा :  तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

निबंध, डॉक्टरांचा सल्ला अन् पटकन जामीन…; पुणे कार दुर्घटनेतील आरोपीला कोर्टाने दिली अजब शिक्षा

Pune Car Accident Kalyani Nagar: पुणे शहरात शनिवारी घडलेल्या अपघात प्रकरणात 17 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला …

EXPLAINER: भाडोत्री गुंडांचे लोकशाही आंदोलन, राष्ट्राध्यक्षांचा घात; रईसींचा मृत्यू Operation Ajax ची पुनरावृत्ती नाही ना?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा सरकारने केली …