ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release January 2023: नवीन वर्षात अनेक  चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी…

‘ताजा खबर’

प्रसिद्ध YouTuber भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या  वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये भुवन ब  वसंत गावडेच्या भूमिकेत दिसणार आहे. या  सीरिजच्या ट्रेलरने चाहत्यांची मनं जिंकली. 

live reels News Reels

‘विक्रम-वेधा’

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा ‘विक्रम-वेधा’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे. 9 जानेवारीला हृतिक आणि सैफचा विक्रम-वेध ओटीटी प्लॅटफॉर्म Voot Select वर प्रदर्शित होणार , असं म्हटलं जात आहे.


 द पेले ब्लू आय (The Pele Blue Eye)

 हॉलिवूड वेब सिरीज ‘द पेल ब्लू आय’ देखील जानेवारीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 6 जानेवारीपासून स्ट्रिम केली जाणार आहे.

हेही वाचा :  Mohammed Rafi : स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी!

‘मिशन मजनू’ 
बॉलिवूडचा सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदान्ना यांचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपटही 20 जानेवारी रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

‘ट्रायल बाय फायर’

‘ट्रायल बाय फायर’ ही  रिलीजसाठी सज्ज झाली आहे. या सीरिजची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. एका सत्य घटनेवर आधारित ही वेब सिरीज 13 जानेवारी रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 1 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …