Viral Video : कल्याणमध्ये भर रस्त्यात महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; 20 मिनिट सुरू होता राडा

Kalyan Crime News : कल्याणमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.  भर रस्त्यात महिलांनी फ्री स्टाईल हाणामारी केली. जवळपास 20 मिनिट महिलांचा हा राडा सुरु होता. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या समोरच हा सर्व प्रकार सुरु होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे(viral video ). या हाणामारीमुळे रस्त्यात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेरीस पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महिलांचा वाद मिटला. यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली. 
बाईकची धडक झाल्यावरुन झाला वाद

कल्याणच्या पत्रीपुला जवळ हा हाणामारीचा प्रकार घडला. दोन बाईक स्वारांची एकमेकांना धडक होऊन अपघात किरकोळ अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु झाली. 

व्हिडिओ व्हायरल

भर रस्त्याच्या मधोमध एकामेकांना मारहाण सुरू होती. तब्बल 20 मिनिटं ही हाणामारी सुरू होती. अनेकांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या व्हिडिओमध्ये पुरुष आणि महिला एकमेकांना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा :  Snake Shoes: कोब्रा शूज घालून रस्त्यावर फिरत होता; प्रसिद्ध उद्योजकाने शेअर केला Video

शेततळे बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी 

अहमदनगरच्या अकोळनेर गावात शेतात जाणाऱ्या रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.  या भांडणांमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये एकाला लोखंडी रॉडचा मार लागल्याने तो बेशुद्ध झालाय.  त्याच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे. सहा जखमींवर जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. 

फुटबॉल मॅचऐवजी चक्क खेळाडूंमध्येच कुस्ती रंगली

कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल मॅचऐवजी चक्क खेळाडूंमध्येच कुस्ती रंगली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. मात्र, स्पर्धेदरम्यान दोन टीम्स आपापसात भिडल्या.  वेताळमाळ आणि हनुमान तालीम मंडळाच्या खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. मात्र त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी मैदानातच एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर प्रचंड वाहतूक कोंडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच निवासस्थान असलेल्या नितीन सिग्नल लुईस वाडी परिसरात संध्याकाळ च्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्यालगतचा सर्व्हिस रोड वरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या वाहतूक कोंडीचे कारण समजू शकले नसून ईस्टर्न एक्सप्रेस वे वरील मुंबईहून ठाण्याच्या दिशेकडील येणाऱ्या मार्गवर तीन हात नाका ते नितीन जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळेच सर्व्हिस रोड वरून बरेच वाहनचालक आपली वाहने नेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्था बाहेर लुईस वाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. 

हेही वाचा :  कल्याणमध्ये विधवा महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या; आरोपी इतरांचे फोन वापरत देत होता चकवा, पण अखेर पोलिसांनी गाठलं | Kalyan Police has arrested accused from Igatpuri in murder case of widow sgy 87

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …