Instagram Reel : कोणतीही इन्स्टाग्राम रील सेव्ह करायचीये? वापरा ‘हा’ शॉर्टकट

नवी दिल्ली : How to download Instagram Reel : आजकाल इन्स्टाग्राम रील्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत. कितीतरी लोक या रील्सचा वापर फक्त टाईमपाससाठीच नाही तर पैसे कमवण्यासाठीही करतात. आपल्यापैकी कितीतरी जणांचा दिवसभर टाईमपास इन्स्टा रिल्सवर होत असतो. इन्स्टा युजर्स त्यांच्या मित्र किंवा कुटुंबासह या रील्स शेअर करू शकतात. तसंच, आपण त्यांना बुकमार्क करून ऑनलाईन सेव्ह देखील करू शकतो. पण तुम्हाला या रिल्स तुमच्या फोनवर डाउनलोड करायच्या असल्यास काय कराल? तुम्हाला याबद्दल माहित आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तसं, अनेक थर्ड पार्टी ॲप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही Instagram Reels डाउनलोड करू शकता. पण या थर्ड पार्टी ॲप्सवर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे कारण ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. पण असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय थेट तुमच्या फोनच्या गॅलरीत रील किंवा स्टोरी सेव्ह करू शकता.

वाचा : Twitter News : ट्वीटरनं २५ लाखांहून अधिक खात्यांना केलं बॅन, पाहा नेमकं कारण काय?

कसं कराल इन्स्टाग्राम स्टोरीज किंवा रील डाउनलोड?

  • सर्व प्रथम तुम्हाला Instagram उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या रील डाउनलोड करायच्या आहेत त्यावर जावे लागेल.
  • तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला शेअर आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा. मग एक मेनू उघडेल.
  • नंतर तळाशी स्क्रोल करा. येथे तुम्हाला Add To Story चा पर्याय मिळेल.
  • आता स्टोरीमध्ये रील एडजस्टकरा.
  • नंतर शीर्षस्थानी असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा
  • यामध्ये तुम्हाला सेव्हचा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा.
  • त्यानंतर हा रील तुमच्या फोनच्या गॅलरीत आवाजासह सेव्ह होईल.
  • त्यानंतर तुम्ही सेव्ह केलेल्या तुमच्या फोन गॅलरीत जाऊन तुम्ही या रिल्स पाहू शकाल.
हेही वाचा :  वयाच्या ५० व्या वर्षीही विशीतील वाटाल, एक्सपर्टने सांगितले 7 अँटी-एजिंग फूड्स

वाचा : WhatsApp वापरताना चुकूनही ‘त्या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर ॲप होईल क्रॅश

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …