Nail Polish Hacks: तुमच्या आवडीची नेल पॉलिश कोरडी पडलीय? ‘या’ पद्धतीनं पुन्हा होईल वापरण्या योग्य

Nail Polish Hacks : नेलपेंट म्हणजे स्त्रियांचा आवडीचा विषय. अनेकदा महिला एकपेक्षा जास्त  नेलपेंट एकत्र खरेदी करतात. मात्र, त्यांचा जास्त वापर होत नसल्याने अनेक काळ पडून राहिलेल्या या नेल पॉलिश कोरड्या होतात. शिवाय नेल पोलिश लावताना थेट पंख्याखाली आल्याने देखील त्या कोरड्या होतात. अशा स्थितीत बाटलीतील नेल पॉलिश लावताता देखील फेकायती वेळ येते. तुमच्या बाबतीतही असं कधी घडते आहे का? जर होय, तर काळजी करू नका आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या वापरून  कोरडी किंवा घट्ट झालेली नेल पॉलिश पुन्हा वापरात आणू शकतो…

कोरड्या नेल पॉलिशचा पुन्हा वापर कसा करावा

1. बाजारात  नेल पॉलिश थिनर नावाचे केमिकल उपलब्ध आहे, ते  देखील घट्ट झालेली नेल पॉलिश पहिले सारखी बनवू शकते. चांगल्या दर्जाचे नेल पॉलिश थिनर खरेदी करा. त्याचे दोन ते तीन थेंब नेल पेंटच्या बाटलीत टाका आणि बॉटल चांगली हलवून घ्या. आता तुम्हाला नेल पॉलिश सैल झालेलं दिसेल. जर तुम्ही यासाठी नेलपॉलिश रिमूव्हर अजिबात वापरू नका, कारण यामुळे नेलपेंट लिक्विडमध्ये गुठळ्या होऊ शकतात 

हेही वाचा :  Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..

2. नेलपॉलिश घट्ट होत असेल तर थोडावेळ उन्हात ठेवून पहा. आता नखांवर लावण्यापूर्वी चांगली मिक्स करा. उष्ण सूर्यप्रकाशात ठेवल्यास नेल पॉलिशमधील  द्रव वितळून जाते. 

हेही वाचा : महिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात ‘असा’ होईल वापर

3. जर नेलपॉलिश सुकली असेल तर  कोमट पाणी घेऊन त्यात ती बॉटल ठेवून द्या आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. याने घट्ट झालेले नेल पॉलिश सैल होऊ लागेल आणि अशा प्रकारे आपण त्या पुन्हा एकदा वापरू शकतो. पाण्यातून काढून टाकल्यानंतर ते चांगले मिक्स करून घ्या आणि नंतर नखांवर लावा. 

4. अनेक  महिला नेल पॉलिश  जास्त काळ टिकण्यासाठी विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्याने त्या कोरडे होणार नाही असा त्यांचा समज असतो. मात्र नेल पॉलिश चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण यामुळे नेल पॉलिशमध्ये घट्ट गुठळ्या तयार होतात. घट्ट झालेली नेल पॉलिश लावणे खूप कठीण होऊन जाते. या कारणामुळेच नेल पॉलिश घरातील  नेहमी सामान्य तापमानात स्टोर करून ठेवा.नेल पॉलिश फेकून देण्यापूर्वी हे टिप्स नक्की ट्राय करून पहा तुम्हला नवीन नेल पॉलिश विकत घेण्याची गरज भासणार नाही. 

हेही वाचा :  Deja Vu: माझ्यासोबत हे आधीही घडलंय! तुम्हाला असा भास कधी झालाय का? यामागे लपलं आहे वैज्ञानिक कारण

अशा प्रकारे नेलपॉलिश वापरा, ते लवकर कोरडे होणार नाही

1. पंख्या चालू असताना त्याच्या खाली बसून नेल पॉलिश कधीही लावू नका. पंखा बंद करूनच नेल पेंट लावा.
2. नेल पॉलिशची बाटली पूर्णपणे उघडी ठेवू नका, ब्रशला नेल पेंट लावताच झाकण हलके बंद करा
3. नेल पॉलिश फ्रीजमध्ये ठेवू नका तर सर्वसामान्य घरचा तपमानामधेच एखाद्या बॉक्समध्ये ठेवा, अन्यथा नेल पॉलिशच्या द्रवामध्ये गुठळ्या तयार होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …