Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! ‘व्लादिमीर’च्या शरीरावर…

Russian Spy Whale : रशियन (Russia) सैन्याची युक्रेनप्रती (Ukraine) असणारी भूमिका, संपूर्ण जगभरात चर्चेत असणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मनसुबे पाहता त्यांची पुढची चाल नेमकी काय असणार याबाबत सर्वांनाच धास्ती लागलेली असते. खासगी आयुष्यातील सिद्धांतांमुळेही अनेकांनाच हादरवणारे हे पुतिन (Putin) एका व्हेल माशामुळं पुन्हा चर्चेत आले आहेत. इतकंच नव्हे तर, सबंध रशिया आणि रशियाच्या संरक्षणार्थ तैनात असणारी Russian Navy सुद्धा सध्या नजरा वळवताना दिसत आहे. 

मासा आणि रशियन नौदलाचा काय संबंध? 

हार्नेस बांधलेला एक beluga whale अर्थात पांढरा महाकाय मासा पुन्हा एकदा स्वीडननजीक असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यात दिसला आहे. “Hvaldimir” असा त्याचा उल्लेख  करण्यात येत असून, तो रशियाचा हेर असल्याचंही म्हटलं जात आहे. थोडं मागे गेलं असता 2019 मध्ये एक गो प्रो हार्नेस बांधलेला व्हेल नॉर्वेच्या उत्तरेकडे दिसला होता. त्याच्यावर लावण्यात आलेल्या लेबलवर Equipment of Saint Petersburg असे शब्द लिहिण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासातून या माशाला रशियन नौदलाकडून संरक्षणाच्या धर्तीवर प्रशिक्षण दिलं जात असल्याचा कयास लावला गेला. 

हेही वाचा :  विजय देवरकोंडा व रश्मिका विवाहबंधनात अडकणार? या दरम्यान रश्मिकाचे मादक फोटोज व्हायरल

पहिल्यांदा दृष्टीक्षेपात आल्यानंतर या beluga whale नं नॉर्वेच्या किनारपट्टीवर वेळ घालवला. पण, त्याच्या हल्लीच्या हालचाली मात्र संशयास्पद असल्याचं आढळून आलं. Hvaldimir नं एकाएकी वेग धारण केला असून, तो प्रचंड वेगानं पोहू लागला आहे. शिवाय त्यानं नॉर्वेचा किनारा ओलांडून स्वीडनही गाठलं. 

एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहानं marine biologist सबॅस्टियन स्ट्रँड यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनीही माशाच्या वेगाबाबत आश्चर्य व्यक्त केल्याची प्रतिक्रिया दिली. ‘त्याचा वेग एकाएकी कसा वाढला ठाऊक नाही, बहुधा hormones बदलांमुळं तो जोडीदाराच्या शोधात असावा किंवा एकटेपणाला कंटाळून तो इतर Whale च्या शोधात असावा’, अशी माहिती त्यांनी दिली. 

हेरगिरी करणारा मासा… नाव त्याचं Hvaldimir

Hvaldimir असं नाव असणारा हा beluga whale साधारण 13 ते 14 वर्षांचा असावा. सध्या त्याचं वय पाहता त्याच्या शरीरातही बरेच अंतर्गत बदल होत असल्याची बाब तज्ज्ञांनी व्यक्त केली. इतकंच नव्हे, तर याच कारणामुळं तो वेगानं पोहतोय, अस्थिर जाणवतोय असा अंदाजही व्यक्त केला. 

सुरुवातीला वर्तवण्यात आलेल्या अंदाजांनुसार हा व्हेल त्याला जिथं प्रशिक्षण दिलं जात होतं तिथून पळ काढून निघालेला दिसत आहे. माणसांमध्ये असतानाही त्याची सहजता आणि त्यांच्याशी वेगळंच संवादकौशल्य पाहता इथं हेरगिरीची शक्यता अधिक बळावते. शिवाय Hvaldimir पाण्यात पडलेला फोन परत देण्याच्या घटनेपासून अधिक प्रकाशझोतात आला होता. 

हेही वाचा :  जुन्या प्रियकरासाठी संसार सोडून पळाली,15 दिवस लिव्ह इनमध्ये..नवं आयुष्य सुरु होण्याआधीच दुर्देवी अंत...

माणसाळलेले मासे… 

Belugas ही माशांची एक अशी प्रजात आहे, जी बरीच माणसाळलेली आहे. यामध्ये सैन्यदलातील प्रशिक्षणांचाही समावेश होतो. जैवशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार शीतयुद्धाच्या काळात  Soviet Union नं या चपळ प्रजातींना प्रशिक्षण दिलं होतं. नौदलाच्या तळांचं संरक्षण, गोताखोरांना प्रशिक्षण, एखाद्या यंत्राचा, यंत्र या साऱ्याचा शोध घेणं यासाठी माशांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. दरम्यान, सध्याच्या घडीला आढळलेल्या Whale बाबत रशियन सैन्यानं स्पष्टीकरण देत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …