पाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई, मोलकरणीचं किळसवाणं कृत्य CCTV त कैद

Viral News : एक किळसवाणी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मोलकरणीला (Maid) अटक केली आहे. पाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई (Wipes with Urine Water) केल्याच्या आरोप तिच्यावर घरमालकाने केला आहे. पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) पोलिसांना दिलं आहे. घरमालकाच्या तक्रारीनंतर मोलकरणीने आपली चूक कबुल केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?
हा किळसवाणा प्रकार ग्रेटर नोएडामधला (Greater Noida) आहे. इथल्या अजनारा होम्स सोसायटीतल्या (Ajnara Homes Society) एका घरात ही महिला मोलकरीनचं काम करते. घरमालकाने मोलकरणीविरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. घरात काम करणारी मोलकरीण पाण्यात लघुशंका करते आणि त्याच पाण्याने घराची साफसफाई करते असा आरोप घरमालकाने केला आहे. वीडियो भी कराई उपलब्ध

पुरावा म्हणून व्हिडिओ दिला
घरमालकाने मोलकरणीच्या किळसवाण्या प्रकारचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलं. घरातील सदस्य नोकरीनिमित्ताने दिवसभर बाहेर असायचे. त्यामुळे घराची साफसफाई करण्यासाठी त्यांनी एका महिलेला कामावर ठेवलं होतं. पण साफसफाईनंतरही रात्री कामावरुन आल्यावर घरात विचित्र वास येत असल्याने त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी घरात सीसीटीव्ही बसवला. सीसीटीव्हीत मोलकरणीचे कारनामे कैद झाले आणि हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :  Corona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव

घरमालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी सुरु केली. सुरुवातीला पाण्यात लघुशंका केल्याचा आरोपवर तीने नकार दिला. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्या महिलेने आपली चूक कबुल केली. यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ मोलकरीण एका घराची साफसफाई करताना दिसत आहे. तिच्या हातात फडका असून सुरुतीला ती जमिनीवर फडका मारताना दिसत आहे. त्यानंतर ती बादली असलेल्या ठिकाणी जाते आणि बादलीवर बसते. त्यानंतर ती बादली उचलून ती दुसऱ्या खोलीत जाते.

मुलं पळवणारी टोळी अटकेत
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. रस्त्याच्या किनारी राहाणाऱ्या गरीब घरातील मुलांचं अपहरण करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी तब्बल 10 जणांना अट करण्यात आली आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 14 मे रोजी एका मुलाच्या अपहरणाचं सीसीटव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तपास सुरु केला. तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. गरीब आणि भिकाऱ्यांच्या लहान मुलांचं ही टोळी अपहरण करत असे आणि त्या मुलांची विविध राज्यात विक्रि करत असत.

हेही वाचा :  भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …