“मी 2014 ला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं”, भारताबाहेर मोदींचा डंका! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले ‘हेच खरे BOSS’

Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑस्ट्रेलिया (Australia) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीयांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी नरेंद्र मोदींसमोर ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही यावेळी उपस्थित होते. सिडनीमधील ऑलम्पिक पार्कमधील स्टेडिअममध्ये आयोजित या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी 20 हजार नागरिकांना संबोधित केलं. यावेळी ेत्यांनी आपण 2014 मध्ये दिलेलं आश्वासन आपण पूर्ण केलं असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला. 

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी यावेळी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, “नरेंद्र मोदी बॉस आहेत. त्यांचं स्वागत करणं माझ्यासाठी नशीबाची बाब आहे”. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘नमस्ते ऑस्ट्रेलिया’ म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. “जेव्हा मी 2014 मध्ये आलो होतो, तेव्हा तुम्हाला वचन दिलं होतं की पुढील 28 वर्षे भारताच्या पंतप्रधानाची वाट पाहावी लागणार नाही. आज मी पुन्हा तुमच्या समोर हजर आहे. मी एकटा आलेलो नाही. मी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत आलो आहे. तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला, यावरून तुमची आम्हा भारतीयांबद्दलची आपुलकी दिसून येते. तुम्ही नुकतेच जे बोललात त्यावरून ऑस्ट्रेलियाचे भारतावर असलेले प्रेम दिसून येते. यावर्षी मला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. आज त्यांनी लिटिल इंडियाच्या पायाभरणीचे अनावरण करण्याची संधी दिली आहे. मी त्या व्यक्तीचे आभार मानतो”, असं मोदी यावेळी म्हणाले. 

नरेंद्र मोदींनी यावेळी भारतीय वंशाचे समीर पांडे सिटी ऑफ पररामट्टा काऊंसलचे मेयर म्हणून निवडले असल्याचा उल्लेख यावेळी केला. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभारही मानले. यावेळी ते म्हणाले की, “पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध 3C चे आहेत असं म्हटलं जात होतं. म्हणजे Commonwealth, Cricket आणि Curry. त्यानंतर 3Ds म्हटलं गेलं. – Democracy , Diaspora आणि Dosti. आता 3E म्हणतात- Energy, Economy आणि Education”.

“क्रिकेट आपल्याला वर्षानुवर्षे जोडत आहे. पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत. आपल्या खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे. यामुळेच सिटी ऑफ पररामट्टा आता पररामट्टा चौक बनले आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

हेही वाचा :  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, "जर त्यांना सोबत यायचं असेल, तर...!" | chandrakant patil offers shivsena for alliance with bjp after four states results

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune Crime News: विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून …

‘भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..’; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान अद्याप झालेलं नसतानाच दिवाळीच्या आसपास होणाऱ्या …