Karnataka Election Result : सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पप्पू पास नाही, तर तो सगळ्यांचा…’

Sushma Andhare on Karnataka Election Result : कर्नाटकात आलेला निकाल हा महाविकास आघाडी करता शुभ संकेत आहे. ‘मोदी हे तो मुमकीन है’, असे म्हणणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसरवलेले ‘हेट पॉलिटिक्स’ला लोक कंटाळले आहेत. या निकालाची ऊर्जा महाराष्ट्रात मिळेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचा फायदा झाला आहे. ज्या राहुल गांधी यांना भाजप सेलने  ‘पप्पू’ ठरवण्याचा प्रयत्न केला.  तो राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे. ‘पप्पू सिर्फ पास नही हुआ, पप्पू मेरिट मे आ रहा है’, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. 

‘भाजप जेव्हा अपयशी ठरते, त्यावेळी ते…’

भाजप जेव्हा अपयशी ठरते, त्यावेळी ते धर्माचा आधार घेते. या निवडणुकीत हनुमानाचा आधार घेतला. अपयशी ठरते तेव्हा भाजप धर्म वा महापुरुषाआड लपते. महाराष्ट्रातील कटकारस्थान रेशीमबागेतून होतात. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता सांगत आहेत, तर सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे फडणवीस यांचा हस्तक्षेप गैर लागू होता असे सांगत आहे. यानंतर फडणवीस नैतिकतेच्या गोष्टी सांगत आहे ती नैतिकता रेशीमबागेतून तयार होते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

हेही वाचा :  “त्यांना सगळ्यांचा बाबा…”; भावूक होत सरसंघचालक मोहन भागवतांनी जागवल्या लतादिदींच्या आठवणी

दरम्यान, ठाकरे गटाचे दुसरे नेते भास्कर जाधव म्हणाले, कर्नाटकच्या निकालाने आम्ही आनंदी आहोत. मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो. भाजप हटाओ देश बचाव, भाजप हटाओ संविधान बचाव हा निकाल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे. भाजपला पराभूत करायचं असेल तर अशीच एकजूट होऊन काम करावं लागेल.  

कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचा आनंद नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला, एमजी रोडवरील काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून ढोल ताश्याच्या गजरात कर्नाटक विजयाचा आनंद साजरा केला.  यावेळी काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरचेही आभार मानले. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसनं महागाई हा मुख्य मुद्दा केला होता.

‘कर्नाटक तो झांकी है, सारा देश अभी बाकी है” म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये जोरदार जल्लोष केला. कर्नाटक निवडणुकीचे निकालाचे चित्र स्पष्ट होताच, कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील जनसपंर्क कार्यालय समोर जल्लोष केलाय. राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेनंतर झालेल्या कर्नाटक निवडणुकीचा विजयाची आगेकूच दिसताच ”राहुल गांधी आगे बडो, हम तुम्हारे साथ है”, ”कर्नाटक तो झांकी है, सारा देश अभी बाकी है”, ”काँग्रेस पक्षाचा विजय असो”,च्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय.

हेही वाचा :  Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम! एका स्कूपच्या किंमतीत खरेदी कराल फोर व्हिलर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर… अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री …

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : 19 मे 2024… पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श कार दोघांना चिरडते. या …