Interesting! विमान उडवून कंटाळा आलाच तर, पायलट काय करतात? वाचून हैराण व्हाल

Interesting Facts : विमानानं एका आठवड्यातून तुम्ही किती वेळा प्रवास करता? असा प्रश्न विचारल्यास प्रथम तर तुमचे डोळे चमकतील. कारण, विमान ही काही रोज प्रवासाला वापरण्याची गोष्ट आहे का, असंच तुम्हीही म्हणाल. त्याची कारणं तुम्हालाही ठाऊकच आहेत. विमान प्रवास आणि त्यातही पहिलावहिला विमान प्रवास हा प्रत्येकाच्याच आयुष्यात असंख्य आठवणी आणणारा असतो. पण, इथंही एका अशा वर्गाबाबत चर्चा झालीच पाहिजे जे आठवड्यातून साधारण तीन किंवा त्याहून जास्तवेळा विमान प्रवास करतात. 

फक्त विमानप्रवास करत नाहीत, तर ही मंडळीच विमान चालवतात. कारण, ते असतात Pilot. विमान प्रवास या मंडळींसाठी नवा नसतो, कारण हा त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. सहसा आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी ही मंडळी चक्क भलंमोठं विमान हवेत झेपावत अपेक्षित स्थळी नेतात या विचारानंच आपण भारावतो. एक दिवस मी उडणार… किंवा मला पंख मिळाले तर मी अमुक आणि तमुक करणार अशी जी स्वप्न आपण बालपणी पाहतो तीच स्वप्न ही मंडळी प्रत्यक्षात जगत असतात. 

तोचतोचपणाचा कंटाळा आणतो आणि…. 

एक वेळ अशीही येते जिथं ही Pilot / वैमानिक मंडळीही कंटाळतात. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात अनेक तासांसाठी कॉकपीटमध्ये बसून असतात, त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण, त्यांनाही कंटाळा येतोच. जिथं एक प्रवासी म्हणून आपण एकाच ठिकाणी तासनतास बसून वैतागतो तिथं ही मंडळीसुद्धा अपवाद ठरत नाहीत.

हेही वाचा :  Govt Job: राज्याच्या पशुसंवर्धन विभागात बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

 

प्रवासादरम्यान आपण कंटाळलो की सहसा काहीतरी वाचतो, खिडकीतून बाहेर पाहतच बसतो, मोबाईलमध्ये गेम खेळतो, एखादा चित्रपट किंवा काहीतरी व्हिडीओ पाहतो. मग हे पायलट काय बरं करत असतील? याचं उत्तर अतिशय रंजक आहे. कारण, पायलट चक्क विमानातच प्रँक करतात. 

असं कोण करतं का? 

Prank … वाचूनच तुम्हाला ही थट्टा वाटेल. पण, हे खरंय. विमान उडवताना मध्येच कंटाळा आला, की ही मंडळी प्रँक करतात. सहसा एका विमानात 2 पायलट असतात. यामध्ये कोणी एक फ्लाईट अटेंडंटसोबत थट्टामस्करी करतात. तर, कोणी सुडोकू खेळांमध्ये रमतात. काही पायलट विमानातच एखादं पुस्तकही वाचतात, गप्पा मारतात. तर, काहीजण चक्क एखादी नवी भाषाही शिकतात. थोडक्यात वेळेचा सदुपयोग करतात. कमाल आहे ना? 

अगदीच कंटाळा किंवा थकवा आल्यास, असं म्हणतात की काही पायलट विमान Auto Mode वर ठेवून Power Nap घेतात. थोडक्यात पायलटही माणसंच आहेत, त्यामुळं कंटाळा आल्यानंतरही ते स्वत:हूनच काही शकला लढवत विरंगुळ्याची साधनं शोधतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘अग्रवालने कोणाला..’

Uddhav Thackeray Group Slams Pune Police: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी झालेल्या पोर्शे कारच्या …

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून देशाच्या एका किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रिवादळाचा (Remal Cyclone) धोका …