Viral Video : सापाच्या रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का? 1 कोटीपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला थरारक व्हिडीओ

Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. सापाच्या एका दंशाने आपण मृत्यूचा दारात पोहोचतो. जंगल आणि जंगल परिसरातील गावांमध्ये विषारी साप, अजगर, नाग सर्रास दिसतात. साप हे विषारी आणि बिनविषारी असतात. पण लोकांना तो दिसला की मग सापाची पण काही खैर नसते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. कधी साप दुचाकीतून निघतो तर कधी हेल्मेटमध्ये दडलेला असतो. 

मध्यतरी सापाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात साप एका महिलेची चप्पल घेऊन फरार होतो. सापाचे अनेक व्हिडीओ रोज अगदी प्रत्येक क्षणाला व्हायरल होतात असं म्हणं पण वावग ठरणार नाही. पण तुम्ही सापाच्या रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का?  (viral Snake video man rescue snake from pipe Shocking video Trending on Internet )

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला आहे. तुम्ही पाहिला आहे का हा व्हिडीओ? काय आहे असं या व्हिडीओमध्ये…तर आम्ही सांगतो तुम्हाला एक भलामोठा साप एका पाईपमध्ये अडकला होता. एका तरुणाने रेस्क्यू करुन सापाचा बचाल केला. 

हेही वाचा :  लवकरच भारतातील 'या' शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

तरुणाने ज्या हिम्मतीने आणि हाताने न घाबरता पाईपातून सापाची सुटका केली. हा सगळ्या थरार या व्हिडीओमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता काळा जीन्स पॅन्ट आणि निळा, पांढऱ्या रंगाची टीशर्ट घातलेला तरुण हाताने हो हाताने घराच्या मागील बाजूस मैदानात पाण्याचा एका पाईपमधून साप काढताना दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता त्या पाईपातून पाणी बाहेर येतं आहे आणि सापाची फक्त शेपटी दिसतं आहे. त्या तरुणाने शेपटीला पकडून त्या सापाची पाइपातून मुक्तता केली. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील सागर पाटील या नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला यूजर्सकडून पसंती मिळतं असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ पाहिला जातो आहे.
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …