Barsu Refinery: माझं कोकण वाचवा… राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

Raj Thackeray On  Barsu Refinery: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये सभा घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बारसू प्रकल्पाला (Barsu Refinery) राज ठाकरे यांनी देखील विरोधाचा सुर दिला आहे. त्यावर राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना भावनिक आवाहन देखील केलं. तसेच सत्ताधाऱ्यांवर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्याची संधी देखील सोडली नाही.

काय म्हणाले राज ठाकरे?

इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. 26/11 चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. 1992 च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय, असं राज ठाकरे म्हणालेत.

बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत, त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.

हेही वाचा :  The Kashmir Files: प्रकाश राज यांनी लगावला टोला; नोटबंदी, करोना, जीएसटीची आठवण करून देत म्हणाले...| prakash raj tweeted about the kashmir files movie - vsk 98

कातळशिल्पांच्या आसपास ३ किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही यापुढे जमीन विकू नका, अशी विनंती राज ठाकरे यांनी स्थानिकांना केली आहे.

राज ठाकरे यांची दादूसवर टीका

पक्ष नसलेले पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले. शिवसेनेची भूमिका रिफायनरींबाबत नक्की काय आहे? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

पाहा Video

दरम्यान, इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोधाचा सुर लगावला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …