ट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करणं किती धोकादायक असतं याची सर्वांनाच कल्पना असते. वाहतूक पोलीस यासंबधी वारंवार आवाहन करत असतात. पण असं असतानाही अनेक लोक सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना दिसतात. यामुळे होणारे अपघातही अनेकदा कॅमेऱ्यात कैद होतात. दरम्यान असाच एक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, यामध्ये ट्रेनची महिला चालक मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) पुन्हा एकदा व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

ट्विटरला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून याच्या माध्यमातून एक छोटासा हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो हे दाखवण्यात आलं आहे. ही दुर्घटना रशियामध्ये ऑक्टोबर 2019 मध्ये घडली होती. 

व्हिडीओत महिला ट्रेन चालवत असताना बिनधास्तपणे आपल्या मोबाइलचा वापर करताना दिसत आहे. महिलेचं पुढे ट्रॅकवर अजिबात लक्ष नसतं. पण त्याचवेळी ट्रॅकवर एक ट्रेन उभी असते. महिलेचं लक्ष खाली फोनमध्ये असल्याने तिला याची कल्पना नसते. पण जेव्हा ती पाहते तेव्हा ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर जाऊन जोरात आदळते. पण सुदैवाने महिला चालकाल काही जखम होत नाही.

ही धडक इतकी जोरात होती की, व्हिडीओत मागील काही प्रवासी पुढे येऊन पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे या अपघातात चालक वाचला असला तरी प्रवासी मात्र जखमी झाले होते. “Driving a train while on a smartphone” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  राम नवमीच्या उपवासाचे आरोग्याला होणारे फायदे, काय सांगतात तज्ज्ञ

या व्हिडीओला 1 कोटींहून अधिकांनी पाहिलं आहे. तसंच अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “जर फोन स्मार्ट असता तर त्याने तिला तात्काळ इशारा दिला असता. पण इतक्या वेगात असताना जर समोर एखादी गोष्ट येत असेल तर एखादा अलार्म का वाजत नाही? तिने नक्कीच लक्ष द्यायला हवं होतं. पण आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असे अपघात टाळले जाऊ शकतात”. तसंच एका युजरने ट्रेनमध्ये रडारवर आधारित ब्रेकिंग फिचर का नसतं? अशी विचारणा केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल …

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

Vegetable Price Hike In Maharashtra: एकीकडे उन्हाचा कडाका तर एकीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा …