Google Storage: गुगल स्टोरेज फुल झालंय? बॅकअपसाठी 'या' सोप्या टीप्सचा करा वापर

नवी दिल्ली :How to increase Google Photos Storage : आपण स्मार्टफोनमधील आपल्याला हवे असलेले फोटोज-व्हिडीओज आपल्या गुगल ड्राईव्हला ठेवू शकतो. ज्यामुळे आपलं डिव्हाईस जरी आपल्याकडे भविष्यात नसेल तरी फोटो-व्हिडीओज सेफ राहतील. पण समजा हेच गुगलचं स्टोरेज फुल झालं म्हणजेच स्टोरेज पूर्णपणे भरलं तर काय करणार? यासाठीच आम्ही काही सोप्या टीप्स तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीनं तुम्ही ही समस्या दूर करु शकता…कसं चेक कराल गुगल स्टोरेज ?
सर्वप्रथम, तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Photos या अॅपमध्ये जाऊन फोटोज हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या Google खात्याने म्हणजेच Gmail ने साइन इन करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूस तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. त्यानंतर Settings वर जा आणि Photos Setting वर क्लिक करा आणि नंतर Back up वर जाऊन मॅनेज स्टोरेज वर जा. त्याठिकाणी तुम्हाला तुमचे स्टोरेज भरण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ दिसेल आणि अखेरीस तुम्हाला कळेल किती स्टोरेज तुम्ही वापरलंय आणि किती शिल्लक आहे.

कसं कराल गुगल स्टोरेज क्लीन?
स्टोरेज चेक करताना ज्या स्टेप्स करता तसंच सुरुवातीला तुम्हाला करायचं आहे. प्रथम तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Photos या अॅपमध्ये जाऊन फोटोज हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या Google खात्याने म्हणजेच Gmail ने साइन इन करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूस तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. त्यानंतर Settings वर जा आणि Photos Setting वर क्लिक करा आणि नंतर Back up वर जाऊन मॅनेज स्टोरेज वर जा क्लिक करा. त्यानंतर Review and Delete या ऑप्शनमध्ये जाऊन select वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिलीट करायचे फोटोज किंवा व्हिडीओज सिलेक्ट करा आणि त्यानंतर ट्रॅशमधूनही सर्व फोटोज डिलीट करा.

हेही वाचा :  Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

गुगल स्टोरेज वाढवण्यासाठी ‘हे’ करा
यासाठीही आधी तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Photos या अॅपमध्ये जाऊन फोटोज हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या Google खात्याने म्हणजेच Gmail ने साइन इन करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूस तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. त्यानंतर Settings वर जा आणि Photos Setting वर क्लिक करा आणि नंतर Back up वर जाऊन Buy Storage या ऑप्शनवर क्लिक करा. मग तुम्हाला हवा असलेला स्टोरेज प्लॅन सिलेक्ट करुन पेमेंटवर क्लिक करा त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करुन Subscribe वर क्लिक करुन तुम्ही स्टोरेज विकत घेऊ शकता. दरम्यान हे सब्सक्रिप्शन दरमहा किंवा तुमच्या प्लॅननुसार तुमच्या खात्यातून पैसे कट करेल त्यामुले हे कॅन्सल करण्यासाठी याच ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता.

वाचा :Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …