“…तर मी राजीनामा देऊन टाकेन,” अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यानंतर ममता बॅनर्जींचं जाहीर आव्हान

Mamata Banerjee on Call to Amit Shah: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोन केल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्याकडे तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा कायम करा अशी विनंती केल्याचा दावा त्यांनी केली आहे. या दाव्यानंतर ममता बॅनर्जी मात्र संतापल्या आहेत. जर हा दावा सिद्ध झाला तर मी मुख्यमंत्रीपद सोडेन असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे. 

 

“मला आश्चर्य आणि धक्का बसला. जर मी अमित शाह यांना तृणमूलच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासंबंधी फोन केल्याचं सिद्ध झालं तर मी राजीनामा देईन,” असं ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात अटींची पूर्तता होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. 

सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दावा केला की, ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी अमित शाह यांना फोन केला आणि मध्यस्थी करत पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा दिला जावा अशी विनंती केली. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींचे माजी सहकारी आहेत. 2021 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे. 

हेही वाचा :  Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही …

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …