Safest SUV Cars in India: भारतामधील सर्वात सुरक्षित SUV Cars ची यादी पाहिली का? सर्वाधिक विकली जाणारी Car ही यादीत

Global NCAP Rating Top 5 Safest SUVs: कोणतीही वस्तू विकत घेताना ती नेमकी किती सुरक्षित आहे यासंदर्भात ग्राहक चाचपणी करुन घेतात. अगदी भाजी थोडीशी खराब असली तरी पर्यायी भाजी घेणारे अनेकजण आपल्या ओळखीत असतील. मात्र अनेक गोष्टींबद्दल सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतली जाणारी काळजी ही चारचाकी म्हणजेच कार खरेदी करताना विचारात घेतली जात नाही. अर्थात हळूहळू हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक ग्राहक गाडीमधील सेफ्टी फिचर्सबरोबर गाडीचं सेफ्टी रॅकिंग किती आहे याबद्दलही विचारणा करताना दिसत आहेत. अनेकजण तर गाडीची सेफ्टी हीच आता पहिली प्रायोरिटी गाडीचे मॉडेल निवडताना ठेवतात. 

ग्राहकांची वाढलेली दक्षता लक्षात घेत कारनिर्मिती कंपन्यांनीही आता सुरक्षित कार्सच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. अनेक नवीन फिचर्सबरोबरच अपघात झाल्यानंतर कारवर किती परिणाम होईल यासंदर्भातील मानांकनांवर आपलं प्रोडक्ट सरस कसं असेल यासाठी कारनिर्मिती कंपन्या प्रयत्नशील आहेत. जागतिक स्तरावर गाडी किती सुरक्षित आहे हे ग्लोबल एनकॅप रेटिंगवरून (Global NCAP Rating) निश्चित केलं जातं. 0 ते 5 दरम्यानच्या रेटिंगमध्ये सर्वोत्तम रेटींग मिळवणारी गाडी अधिक सुरक्षित समजली जाते. आज आपण भारतामध्ये अशाप्रकारचं सर्वोच्च रेटिंग मिळालेल्या भारतामधील 5 एसयूव्ही कोणत्या ते पाहूयात…

हेही वाचा :  'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र

महिंद्रा एक्सयुव्ही 300 (Mahindra XUV300)

भारतातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल बोलताना महिंद्राच्या या गाडीचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. या गाडीला ग्लोबल एनकॅप रेटिंगमध्ये सज्ञान व्यक्तींसाठीचं रेटींग 5 असून मुलांसाठीचं रेटिंग हे 4 आहे. म्हणजेच ही गाडी सर्वात सुरक्षित गाड्यांमध्ये अव्वल मोजक्या गाड्यांपैकी एक आहे.

टाटा पंच (Tata Punch)

कारनिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीची ही कार मायक्रो एसयुव्ही प्रकारात मोडते. विशेष म्हणजे ही देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सच्या यादीत असलेली कार आहे. या गाडीचा समावेश भारतातील सर्वात सुरक्षित कार्समध्ये होते. या गाडीला ग्लोबल एनकॅप रेटींगमध्ये सज्ञान व्यक्तींसाठी 5 तर मुलांसाठी 4 इतकं आहे.

महिंद्रा एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV700)

सर्वात सुरक्षित एक्सयुव्ही गाड्यांमध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 700 गाडीचाही समावेश होतो. भारतातील आघाडीच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या गाड्यांमध्ये या गाडीचा समावेश होतो. या गाडीला ग्लोबल एनकॅप रेटिंग सज्ञानांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार इतकं आहे.

हेही वाचा :  Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

सर्वात आधी ग्लोबल एनकॅप रेटींगमध्ये 5 पैकी 5 स्टार मिळवणारी पूर्णपणे भारतीय बनावटीची कार अशी टाटा नेक्सॉनची ओळख आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय गाडी असण्याबरोबरच ही सर्वात सुरक्षित गाडीही आहे.

व्हीडब्ल्यू टियागन आणि स्कोडा क्वॅश (VW TAIGUN आणि SKODA KUSHAQ)

VW Taigun आणि Skoda Kushaq या दोन्ही भारतात निर्माण करण्यात आलेल्या एसयुव्ही कार्स आहेत. दोन्ही कार्स या एमक्यूबी एओ इन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. दोन्ही गाड्यांचं ग्लोबल एनकॅप क्रॅश रेटींग 5 पैकी 5 इतकं आहे. म्हणजेच या गाड्या सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहेत. या गाड्या सज्ञान आणि मुलांसाठीही सारख्याच प्रमाणात सुरक्षित आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …