रोजच्या या चुकांमुळे झपाट्याने वाढतोय पोट-आतड्याचा कॅन्सर, या 5 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Cancer Early Signs And Symptoms : Cancer हा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि सर्वांची लक्षणे आणि त्यामुळे होणारे परिणाम वेगवेगळे आहेत. Colorectal Cancer हा देखील एक प्रकारचा कर्करोग आहे ज्याला Colon Cancer असेदेखील म्हणतात. याचा सहसा वृद्धांवर परिणाम होतो असे मानले जाते, परंतु त्याचा परिणाम तरूण मुलामुलींवरही होऊ शकतो.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने (ACS) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोलन कर्करोगाचे निदान झालेल्या पाचपैकी एक रुग्ण 55 वर्षाखालील असतो. असे का घडते याचे नेमके कारण माहित नाही परंतु शास्त्रज्ञांचा असं म्हणणं आहे की, हे पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांसारख्या अनेक संभाव्य कारणांमुळे होऊ शकते. आज आपण याच विषयावर अत्यंत महत्त्वाची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य :- iStock)

पोटाच्या कर्करोगाचा सर्वात जास्त धोका कोणाला?

पोटाच्या कर्करोगाचा सर्वात जास्त धोका कोणाला?
  1. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखिका रेबेका सिगेल यांच्या मते, कोलन अर्थात आतड्याच्या कॅन्सरच्या सुमारे एक तृतीयांश प्रकरणे फॅमिली हिस्ट्रीशी संबंधित आहेत.
  2. जास्त वजन हे देखील एक प्रमुख कारण आहे.
  3. कोलन कॅन्सरचे 5 टक्के कारण वाढलेले वजन आणि लठ्ठपणा हे आहे.
  4. याशिवाय वजन जास्त असल्याने पोटाच्या उजव्या बाजूला ट्यूमर होऊ शकतो.
  5. साखर-गोड पेय पदार्थ आणि प्रक्रिया केलेले मांस यांचे जास्त सेवन केल्याने सुद्धा कोलन कॅन्सर होण्याचा धोका नाकारता येत नाही.
हेही वाचा :  शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल

(वाचा :- पुरूषहो, या अवयवांत वेदना झाल्यास सावधान, लघवीच्या प्रेशरने रोज गाढ झोपेतून उठत असाल तर झालाय प्रोस्टेट कॅन्सर)​

पोटाचा कॅन्सर कोणाला होतो?

पोटाचा कॅन्सर कोणाला होतो?

वर नमूद केलेल्या घटकांचा मायक्रोबायोमवर परिणाम होतो. हे बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव आहेत, जे मानवी पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. आतड्याच्या किंवा मलाशयाचे निरोगी पेशी बदलतात आणि नियंत्रणाबाहेर वाढत जातात, त्यातूनच ट्यूमर तयार होतो आणि अशा प्रकारे कोलन कर्करोग जन्माला येतो.
(वाचा :- Piles Remedy: पोट साफ न होणं आणि भयंकर मूळव्याध 100% बरा करतात या 15 भाज्या, खेचून बाहेर फेकतात आतड्यांतील घाण)​

पोटाच्या कॅन्सरचे संकेत

पोटाच्या कॅन्सरचे संकेत

कर्करोग कोणताही असो जर तो वेळीच समजला आणि त्याचे निदान झाले तर मनुष्य जगण्याची शक्यता 90 टक्के असते. कोलन कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट लागू होते. जर हा आतड्याचा कॅन्सर वेळीच समोर आला तर रुग्ण 100 टक्के बरा होऊ शकतो. म्हणूनच संशोधकांनी अशी शिफारस केली आहे की, तुम्ही लक्षणांवर लक्ष ठेवा जेणेकरुन त्याचे योग्य निदान आणि उपचार करता येतील. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

  1. शौचातून रक्त पडणे
  2. आयर्न अर्थात लोहाची कमतरता
    (वाचा :- Burn Belly Fat : या एका उपायाने मेणासारखी वितळते पोट, मांड्या आणि कंबरेवरची चरबी, लटकणारं पोट होतं कायमचं सपाट)​
हेही वाचा :  आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय

तरूणांमध्ये दिसणारी लक्षणे

तरूणांमध्ये दिसणारी लक्षणे
  1. ​तरूण वयाच्या रुग्णांमध्ये पोटदुखी हे कोलोरेक्टल कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण आहे.
  2. याशिवाय अनावश्क व अचानकच वजन कमी होणे
  3. विष्ठेचा रंग, आकार आणि पोत बदलणे
  4. शौचाला बसलेलं असताना गुदाशयातून रक्तस्त्राव होणे
  5. लोह कमतरता निर्माण होणे

ही सर्व लक्षणे त्या तरुणांमध्ये दिसतात ज्यांना कोलन कॅन्सर होतो.
(वाचा :- Diabetes Yoga : डायबिटीजच्या औषधांपासून कायमची मुक्ती देतात हे 5 उपाय, स्वत: एक्सपर्ट्सनी दिली योग्य माहिती..!)​

पोटाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका

पोटाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिनचे प्राध्यापक आणि उपाध्यक्ष अँड्र्यू चॅन म्हणाले की, बहुतेक तरुणांना वाटते की ते निरोगी आहेत. ते दिसणारी लक्षणे आणि समस्या गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. चांगल्या निदान आणि उपचारांसाठी लक्षणे वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. अर्थातच पोटाशी संबंधित समस्या सामान्य आहेत परंतु जर तुम्हाला वर नमूद केलेली चिन्हे किंवा लक्षणे जाणवत असतील तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.
(वाचा :- ​Potato side effect सावधान, डॉक्टर म्हणतात या पद्धतीने बटाटा खाणा-याच्या नसा होतात नष्ट आणि शरीरभर पसरतो कॅन्सर)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  कोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: ‘अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..’, पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार …

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र …