जान्हवी कपूरच्या कातिल अदा तर सारा अलीच्या रिप्ड जीन्सने वेधले सर्वांचे लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने खूपच कमी वेळामध्ये तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ड्रेसिंग सेन्स खूपच चांगला आहे. सारा तिच्या क्युट स्माईलने सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा फॅशन सेन्स खूपच सुंदर आहे. अलीकडेच तिला अशाच एअरपोर्ट लुकमध्ये पाहिले गेले. यावेळी तिने क्रॉप टॉप आणि डिस्ट्रेस्ड जीन्स परिधान केली होती. तर यावेळी तिची बेस्टफ्रेंड जान्हवी कपूर देखील पाहायला मिळाली. यावेळी जान्हवीने फ्लोरल प्रिंटसह मिडी ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. यावेळी या दोघांचा लुक खूपच सुंदर होता. तु्म्ही देखील या दोघींकडून फॅशन आयडीया घेऊ शकता. (फोटो सौजन्य- योगेन शहा)

कॅज्युअल लूकमध्ये सारा अली खान

कॅज्युअल लूकमध्ये सारा अली खान

सारा अली खानच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर सारा नेहमीच आरामदायी कपड्यांमध्ये पाहायला मिळते. या एअरपोर्ट लुकसाठी साराने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता, ज्याला यू नेकलाइन देण्यात आली होती. या टॉपमध्ये त्याचे टोन्ड फिगर फ्लॉंट करत होती. यावेळी सारावे हाय डिस्ट्रेस्ट जीन्स परिधान केली होती. सध्या या प्रकारच्या जीन्सचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :  शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा

(वाचा :- लाल भडक साडी, भाळी चंद्रकोर केसात गुलाब लावून प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक, चाहते म्हणतात ‘प्राजू रूपाची खाण’) ​

पांढरा क्रॉप टॉप आणि डिस्ट्रेस्ड जीन्स

पांढरा क्रॉप टॉप आणि डिस्ट्रेस्ड जीन्स

तिचा लूक पूर्ण करताना साराने गुलाबी आणि पांढरे शूज घातले होते. यावेळी साराने चंकी ब्रेसलेट आणि लाईट मेकअप कॅरी केला होता. साराप्रमाणेच तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

क्युट पिंक बॅग

क्युट पिंक बॅग

यावेळी साराने क्युट रंगाची पिंक बॅग कॅरी केली होती. चेन असणाऱ्या या बॅगमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

(वाचा :- शाहरूखची लाडकी लेक सुहानाचा ‘हा’ लुक का होतोय व्हायरल? कागदापेक्षा पातळ ड्रेसमध्ये तापवलं वातावरण) ​

उन्हाळ्यासाठी बेस्ट लुक

उन्हाळ्यासाठी बेस्ट लुक

जान्हवीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तिने मल्टीकलर फ्लोरल प्रिंटसह मिडी ड्रेस घातला होता. या आउटफिटवर असणारे रंग खूपच सुंदर होते. यामध्ये हलका गुलाबी, पिवळा, निळा आणि जांभळा रंगांचा खूपच सुंदर पद्धातीने वापर करण्यात आला होता. उन्हाळ्यासाठी हे रंग खूपच चांगले ठरू शकतील. या सुंदर ड्रेसला डीप स्वीटहार्ट नेकलाइन देण्यात आली होती.

हेही वाचा :  कथित बॉयफ्रेंडचा हात धरुन जान्हवी कपूरने वाढवला इंटरनेटवरचा पारा

नो मेकअप लुक

नो मेकअप लुक

जान्हवीच्या ड्रेसची फिटिंग इतकी चांगली ठेवली गेली होती, ज्यामध्ये तिची फिगर पूर्णपणे हायलाइट करण्यात आली होती. उन्हाळ्यासाठी हा बेस्ट लुक असू शकतो. हा लुक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले होते.

(वाचा :- छोट्या पडद्यावरील या सुनेला ओळखलंत का? बिकिनीमधील्या फोटोंनी चाहत्यांना लावला ‘४४० व्होल्टचा करंट’) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …