धर्माची सीमा ओलांडून विवाहित पुरूषाच्या पडली होती अभिनेत्री प्रेमात, ट्रॅजिक लव्ह स्टोरी

फिल्मी दुनियेत सारिका हे नाव आजही अभिनयासाठी तितकेच आदराने घेतले जाते. नुकतेच ‘उँचाई’ या चित्रपटात सारिकाने काम केले. लहानपणापासून गरीबी पाहिली. सुंदर चेहरा आणि अभिनय यामुळे सारिकाने खूपच कमी वयात अभिनय क्षेत्रात पाय रोवले. मात्र विवाहित कमल हसनच्या प्रेमात सारिका पडली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या.

वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या सारिकाच्या वाट्याला म्हातारपणातही एकटेपणा आलाय. सारिका आणि कमलने लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली झाल्या. मात्र सारिकासाठी पहिल्या पत्नीला सोडलेल्या कमलने तिसऱ्या प्रेमासाठी सारिकालाही सोडले. घटस्फोटानंतर सारिकाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. जाणून घ्या कसे होते सारिकाचे प्रेम का नाही टिकले. (फोटो सौजन्य – @Shrutzhaasan @aksharaa.haasan Instagram)

वडिलांच्या प्रेमाला पारखी

वडिलांच्या प्रेमाला पारखी

सारिका ठाकूर अशा मराठमोळ्या कुटुंबातून आलेल्या सारिकाने खूपच कमी वयात आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. अनेक क्लासिक चित्रपटांमध्ये सारिकाने काम केले. रझिया सुल्तान, बडे दिलवाले अशा अनेक चित्रपटातून सारिका दिसली. मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या सारिकाच्या वडिलांना ती ५ वर्षांची असतानाच घर सोडले आणि सारिकाच्या संघर्षाला सुरूवात झाली. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच आईने तिला इंडस्ट्रीत काम करायला लावले.

हेही वाचा :  धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून सुरूवात

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून सुरूवात

सारिकाने १९६७ मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. निळ्या डोळ्यांच्या सारिकाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केले. ८० च्या दशकात सारिका ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री झाली. त्याचवेळी तिच्या आयुष्यात अभिनेता कमल हसनचा प्रवेश झाला आणि दोघांची घट्ट मैत्री झाली.

(वाचा – ट्रॅड वाईफ म्हणजे काय? काय आहे हा जुन्या संकल्पनेचा नवा ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का)

विवाहित कमलच्या प्रेमात सारिका

विवाहित कमलच्या प्रेमात सारिका

लहानपणापासूनच शाळेत सारिका गेली नाही. केवळ काम आणि काम करत राहिली. त्यामुळे कमल हसन विवाहित असूनही सारिका त्याच्या प्रेमात वाहत गेली. कमलच्या पहिल्या लग्नात तणाव असल्याने दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. कमल आणि सारिकाचे संबंध वाढले आणि सारिका गरोदर राहिली. त्यानंतर दोघांनी १९८८ मध्ये लग्न केले.

(वाचा – धर्माची मर्यादा ओलांडून लिव्ह इन मध्येही राहिले, ४१ वर्षांचा रत्ना-नसिरूद्धीन शाहचा संसार देतोय नव्या पिढीला प्रेरणा)

२००२ मध्ये दोघे वेगळे झाले

२००२ मध्ये दोघे वेगळे झाले

​मराठमोळी सारिका आणि मुस्लीम धर्मातील कमल हसन ही दोन टोकं होती. दोघांच्या संस्कृतीमध्येही खूप फरक होता. लग्नानंतर मात्र दोघांच्याही आयुष्यात दोन मुलींनंतर भांडणांचं वादळ घोंगावू लागलं आणि जास्त काळ हे लग्न टिकू शकलं नाही. सारिका आणि कमल वेगळे झाले. पुन्हा सारिकाच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला.

हेही वाचा :  Vande Bharat Express : मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुस्साट धावणार

(वाचा – हिंदू-मुस्लीम विभिन्न धर्म पण खऱ्या अर्थाने जिंकलं प्रेम, मिनी माथुर – कबीर खानच्या लग्नाला झाली २५ वर्ष )

घटस्फोटानंतर केवळ ६० रूपये खिशात

घटस्फोटानंतर केवळ ६० रूपये खिशात

प्रेमाने सर्व काही मिळत नाही हे सारिकाला कळले आणि जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिच्याकडे केवळ ६० रूपये होते असं तिने एका मुलाखतीत सिमी ग्रेवालला सांगितले होते. सारिकाने या काळातही कोणाची मदत घेतली नाही. तर कमलने यावर उत्तर दिले होते, सारिकाची आर्थिक स्थिती मला माहीत नव्हती आणि तिला कोणाचीही मदत घ्यायला आवडायची नाही याच गोष्टीच्या मी प्रेमात होतो असे सांगितले.

मुलींनीही सोडली होती साथ

मुलींनीही सोडली होती साथ

इतकंच नाही तर मुलींकडूनही सारिकाला प्रेम मिळालं नाही. एकंदरीतच तिला कोणत्याही नात्यात हवं तसं प्रेम मिळालं नाही. मुलींनीही काही काळापुरती सारिकाची साथ सोडली होती. अजूनही मुली सारिकाच्या जास्त जवळ नसल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमधून लक्षात येते. पुन्हा एकदा सारिकाने कामाला सुरूवात केली आणि आता सारिका अत्यंत साधं आयुष्य जगत असल्याचं दिसून येतंय.
एकंदरीतच प्रेम आंधळं असतं हे म्हटलं जातं, हे सामान्य लोकांच्याच नाही तर अगदी सेलिब्रिटींच्या बाबतीतही अनेकदा दिसून आलं आहे. सारिकाचं हे प्रेमातील संघर्षमय आयुष्य वाचून नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा :  Nafisa Ali Birthday: नफीसाला जेव्हा सासूने स्वीकारले नाही, नवऱ्यासह राहावे लागले मित्राच्या घरी, बॉलीवूडमध्ये गाठली ‘उँचाई’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : वरुणराजा पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूने (Monsoon Update ) राज्यासह देशात …

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …