Genital Tuberculosis: शरीराच्या या भागात TB झाला असेल तर आई होण्यास येतो अडथळा

World TB Day 2023: गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांना आपल्या प्रजननांगातील अर्थात प्रायव्हेट भागात टीबी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला Genital Tuberculosis असंही म्हणतात. गेल्या पाच वर्षात १०% वाढ झाली असून टीबीमुळे आजारी पडून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसतंय.

FGTB हे टीबीचे एक स्वरूप असून महिलांच्या प्रजनन प्रमाणीवर याचा परिणाम होतो. महिलांमध्ये एक्स्ट्रा पल्मोनरी टीबीचे सर्वात सामान्य स्थान आहे ते म्हणजे प्रजननांग, जे फॅलोपियन ट्यूब, गर्भाशयातील भाग, अंडाशय, गर्भाशय ग्रिव्हा अथवा योनीमार्गावर परिणाम करतात. या लेखातून बिजवासनच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या IVF स्पेशालिस्ट डॉ. रत्ना सक्सेना यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

ट्युबरक्युलोसिस आणि फर्टिलिटी

ट्युबरक्युलोसिस आणि फर्टिलिटी

टीबी बरेचदा फुफ्फुसांना प्रभावित करतो. मात्र जठर, मेंदू आणि पेल्विस या शारीरिक अवयवांवरही याचा प्रभाव दिसून येतो. महिलांना प्रजननांग टी.बी. हा फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयासह अँडोमेट्रियमवरदेखील परिणामकारक ठरतो. अशा स्थितीत हा अशरमॅन सिंड्रोम स्वरूपात असल्याचे मानले जाते. टी.बी. फॅलोपियन ट्यूब संक्रमित करून ब्लॉक करतो आणि यामुळे मासिक पाळीवरही याचा परिणाम होतो.

हेही वाचा :  बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाले

(वाचा – या अभिनेत्रीने ५६ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, गरोदर राहिल्याने डॉक्टरही झाले अवाक्)

Silent Killer ठरतो टी. बी.

silent-killer-

जेनेटाईल ट्युबरक्युलोसिसला सायलंट किलर म्हटले जाते. कारण याची लक्षणे पटकन कळून येत नाहीत आणि जेव्हा याची लक्षणे जाणवू लागतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ज्यावेळी जेनेटाईल टी.बी. च्या बाबतीत कळेल तेव्हा त्वरीत यावर उपाय करायला घ्यावा. जेनेटाईल टी.बी. हा एक एक्टोपिक प्रेग्नन्सीचादेखील भाग असू शकतो. यावर वेळीच उपाय न झाल्यास, टीबीमुळे वेळेच्या आधी बाळाचा जन्म, जन्माच्या वेळी कमी वजन, एक्टोपिक प्रेग्नन्सी अथवा नवजात मृत्यू दरामध्ये वृद्धी होऊ शकते.

जेनेटाईल टी. बी. चे निदान

जेनेटाईल टी. बी. चे निदान

जेनेटाईल शरीरात टीबी होणे हे एका गंभीर आजाराचे लक्षण आहे. वजन कमी होणे, थकवा, पेल्विक दुखणे, असामान्य योनी स्राव आणि हलकासा ताप हे सामान्य लक्षण असून मासिक पाळी रक्तस्राव न होणे अथवा असमान्य स्वरूपात अधिक रक्तस्राव आणि अनियमित मासिक पाळी ही सर्व लक्षणे दिसून येतात. याशिवाय या टी.बी. मध्ये काही महिलांना मासिक पाळीत रक्ताचे डाग पडणं, संभोगादरम्यान दुखणे आणि दीर्घकाळ पेल्विक भागात त्रास होण्याचा अनुभव येतो.

हेही वाचा :  '...तर गावकऱ्यांना मारुन टाका'; ड्रीम प्रोजेक्टच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारी आदेश

(वाचा – ६ महिन्यात दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म, मोमो ट्विन्स म्हणजे नेमके काय)

जेनेटाईल टी. बी. वरील उपाय काय आहे?

जेनेटाईल टी. बी. वरील उपाय काय आहे?

सुरूवातीला टी. बी. आजार कळल्यास वंध्यत्व आणि प्रजननांग मार्गामध्ये त्रास होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो. त्यामुळे कळल्यानंतर त्वरीत उपाय सुरू करावेत.
WHO नुसार टी. बी. च्या रुग्णांना ६ महिन्यांसाठी रिफँपिसिन, एथमबुटोल आणि पॅइराजिनामाईडचा डोस दिला जातो. याशिवाय FGTB च्या मुख्य उपायापर्यंत योग्य प्रमाणात औषधांचा मारा केला जातो. कॉम्बिनेशन थेरपी साधारण ६-९ महिने करून योग्य उपाय केले जातात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …