Black Water नक्की काय आहे? डायबिटीजपासून ते वजन कमी करण्यापर्यंत जबरदस्त फायदे

पूर्ण जगात हल्ली ब्लॅक वॉटर हा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटीच्या हातातही ब्लॅक वॉटर दिसून येतंय. त्यामुळे सामान्य माणसांना आता याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी, पचनक्रिया योग्य होण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता भासतेच.

ब्लॅक वॉटर याचा अर्थ अजिबात वाईट नाही. प्रदूषित पाणी असा त्याचा अर्थ नसून एल्कलाईन वॉटरसंदर्भात हा उपयोग केला जातो. सामान्य पाण्याच्या पीएचची पातळी ७ असून ब्लॅक वॉटरची ८ ते ९ पीएच पातळी असते. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिनसारख्या अनेक खजिन्यांचा यामध्ये समावेश असतो. डाएटिशयन आणि हेल्दी स्टेडी गो च्या सह-संस्थापक काजल वट्टमवारने आपल्या इन्स्टा पेजवर याविषयी माहिती दिली आहे. तसंच अधिक माहिती मिळवून नक्की याचा काय उपयोग आहे याबाबत तुम्हाला सांगत आहोत. (फोटो सौजन्य – @evocus_water Instagram/iStock)

खरंच ब्लॅक वॉटर फायदेशीर आहे का?

ब्लॅक वॉटर कसे तयार होते?

ब्लॅक वॉटर कसे तयार होते?

How Is Black Water Made: ब्लॅक वॉटर अथवा एल्कलाईन वॉटर हे दोन पद्धतीचे असते. नैसर्गिक ब्लॅक वॉटर आणि कृत्रिम ब्लॅक वॉटर. पाणी डोंगरातून वाहून धबधब्याच्या स्वरूपात कोसळते तेव्हा ब्लॅक वॉटर तयार होते. हे पाणी मिनरल्ससह असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील पीएच लेव्हल वाढते. मात्र सेलिब्रिटीच्या हातात दिसणाऱ्या ब्लॅक वॉटरच्या बॉटल्स या केमिकल प्रोसेस करून तयार करण्यात येतात.
सामान्य पाण्याच्या तुलनेत पीएच लेव्हल वाढविण्यासाठी Lonizer नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. मात्र अजूनही यावर संशोधन चालू आहे.

हेही वाचा :  वयाच्या ५० व्या वर्षीही विशीतील वाटाल, एक्सपर्टने सांगितले 7 अँटी-एजिंग फूड्स

ब्लॅक वॉटर आणि नॉर्मल पाण्यातील फरक

ब्लॅक वॉटर आणि नॉर्मल पाण्यातील फरक

Difference Between Black And Normal Water: या दोन्ही पाण्यात नेमका काय फरक आहे ज्यामुळे ब्लॅक वॉटरची मागणी वाढली आहे जाणून घ्या.

  • ब्लॅक वॉटरमध्ये एल्कलाईन असून नॉर्मल पाणी हे न्यूट्रल असते
  • ब्लॅक वॉटरमध्ये खनिजे आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात तर
  • साध्या पाण्याच्या तुलनेत यामध्ये अधिक ऊर्जा असल्याचे सांगण्यात येते
  • साध्या पाण्याला चव नसते तर ब्लॅक वॉटरला सुरूवातीला थोडा कडवटपणा जाणवतो

ब्लॅक वॉटर हायड्रेशनसाठी

ब्लॅक वॉटर हायड्रेशनसाठी

Black Water For Hydration: ब्लॅक वॉटर रक्तातील चिकटपणा दूर करून व्यायामामुळे होणारे डिहायड्रेशन कमी करण्यास फायदेशीर ठरते. मिनरल्स आणि विटामिन्स यामध्ये मिक्स करण्यात आल्यामुळे ब्लॅक वॉटर हायड्रेशनसाठी अधिक फायदेशीर ठरते. व्यायामानंतर अनेकदा डिहाड्रेशनची समस्या येते. त्यावेळी या पाण्याने त्वरीत फरक पडतो.

(वाचा – Bird Flu Outbreak: बर्ड फ्लू ची कारणे, लक्षणे आणि उपाय )

मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी

मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी

Black Water For Metabolism: एल्कलाईन वॉटर मेटाबॉलिजला अधिक उत्तेजना देण्यास मदत करते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरते. पचनक्रिया सुधारून तुम्हाला अधिक ऊर्जात्मक राहण्यास मदत मिळते. त्यामुळेच खेळाडूंसाठी सध्या या पाण्याचा वापर अधिक वाढल्याचे दिसून येते.

हेही वाचा :  Maharashtra Weather : राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले

(वाचा – रोज रात्री नाभीमध्ये घाला तेल, नाभीत तेल घालण्याचे आरोग्यदायी फायदे)

डायबिटीजसाठी लाभदायक

डायबिटीजसाठी लाभदायक

Black Water For Diabetes: डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठीही याचा फायदा होत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ब्लॅक वॉटरचा फायदा होतो. HbA1c कमी करण्यासाठी याचा उपयोग होत असून त्यासाठीही वापर करण्यात येतो.

(वाचा – पोट आणि कमरेवरील हट्टी चरबी करेल कमी जास्वंदीचा चहा, काय सांगतात डाएटिशियन)

हायपरअ‍ॅसिडीसाठी

हायपरअ‍ॅसिडीसाठी

Black Water For Hyperacidity: ब्लॅक वॉटरमधील हाय पीएच लेव्हल हे अ‍ॅसिड रिफ्लेक्सचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर ठरते. अ‍ॅसिडिटी संबंधित समस्या कमी करून पचनशक्ती अधिक चांगली करण्यासाठी ब्लॅक वॉटरचा उपयोग करता येतो.

ब्लॅक वॉटर पिणे सुरक्षित आहे का?

ब्लॅक वॉटर पिणे सुरक्षित आहे का?

आतापर्यंत ब्लॅक वॉटरच्या होत असलेल्या वापरावरून हे पिणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. मात्र विशेतज्ज्ञांच्या मते या ब्लॅक वॉटरचा नक्की दीर्घकालीन प्रभाव किती आहे किंवा यामुळे काही आजार बरे होतात का याबाबत अजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

ब्लॅक वॉटरमुळे होणारे नुकसान

ब्लॅक वॉटरमुळे होणारे नुकसान
  • मळमळ आणि उलटी होणे
  • कार्डियाक सेल्समुळे मृत्यूचा कारणीभूत ठरू शकतेॉअत्याधिक ब्लॅक वॉटर सेवन केल्याने पीएच लेव्हल बदलू शकते
हेही वाचा :  राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

ब्लॅक वॉटरची किंमत ही साधारण ५०० मिलीलीटरसाठी १००-२०० रूपये इतकी असते. काही लोकांसाठी हे फायदेशीर ठरते हे खरे असले तरीही यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …