Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Maharashtra Weather Rain Alert : निसर्गाने आपलं रौद्ररुप (Today Weather Update)दाखवलं आहे. उन्हाळ्याचा तडाख्यात अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरे (Rain alert) आणि जिल्ह्यांमध्ये 20 मार्चपर्यंत गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   (meteorological department predicted rain till march 20 alert hailstorm in marathwada farmer imd updates in marath)

शेतकरी हवालदिल!

जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालीय. या गारपिटीनं शेतकऱ्यांचं पीक अक्षरश: उद्ध्वस्त झालंय. जाफ्राबाद आणि जालना तालुक्यात गारपीट झालीय. द्राक्ष आणि आंबा बागांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. नंदापूर, कडवंची,पीरकल्याण भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे या भागांतील द्राक्ष, गहू, ज्वारी,कांदा या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय…(imd predicted rain)

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

बीडमध्ये वादळी वा-यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय…यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय..कापसाच्या वाती झाल्या आहेत तर ज्वारी जमीन दोस्त झाली आहे… काढलेली पिक पावसानं भिजली आहेत बीड जिल्ह्यातील बीड वडवणी माजलगाव केज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसासह गारपीट झाली यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. (Maharashtra Unseasonal Rains)

मुख्यमंत्र्यांकडून दिलासा!

अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतक-यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  (Eknath Shinde)मोठा दिलासा दिलाय.. शेतक-यांचं पावसामुळं जेवढं नुकसान होईल, तेवढं सगळं सरकार भरून देईल, अशी घोषणा शिंदेंनी केली..

गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले (Unseasonal Rains In Maharastra)

सलग दोन दिवस सुरू असलेल्या गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झालंय. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलायचं पाहिला मिळतं आहे. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेलाय. तरदुसरीकडे राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

हेही वाचा :  Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..

Continuous Eye Rubbing Lost Vision:  डोळ्यात काही गेलं तर आपल्यापैकी अनेकजण डोळे चोळतात. अगदी सहज …

‘राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..’; ‘मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले’

Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांवरुन उद्धव ठाकरे …