सुरभी हांडेचा मनमोहक लुक, नऊवारीतला साज आणि नथीचा नखरा

अभिनेत्री सुरभी हांडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच तिने म. टा. सन्मान सोहळ्याला हजेरी लावली आणि सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. सुरभीच्या या मराठमोळ्या खास लुकमुळे तुम्हीही तिच्या प्रेमात पडला नाहीत तर नवलच!

सुरभीचा हा मराठमोळा नऊवारी साडी, नथीचा नखरा लुक अत्यंत लोभसवाणा आणि आकर्षक असून येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाला तुम्हीही अशी स्टाईल करू शकता. त्यासाठी काही फॅशन टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सुरभीचा हा खास लुक म. टा. च्या वाचकांसाठी. (फोटो सौजन्य – @shubham_sarangule_photography Instagram)

चंदेरी बुट्ट्यांची रॉयल निळी साडी

चंदेरी बुट्ट्यांची रॉयल निळी साडी

सुरभीने या सोहळ्याला चंदेरी बुट्ट्यांची रॉयल निळी नऊवारी नेसली आहे. Royal Tasta ब्रँडची ही साडी अप्रतिम दिसत असून सुरभीचे सौंदर्य यात बहरून आले आहे. सिल्कच्या या साडीला चंदेरी बुट्ट्यांनी अधिक शोभा आली आहे. त्या साडीवर संपूर्ण डिझाईनर बॉर्डर दिल्याने या साडीचा लुक अधिक रॉयल झालेला दिसून येतोय.

डिझाईनर ब्लाऊज

डिझाईनर ब्लाऊज

या रॉयल साडीसह डार्क गुलाबी रंगाचा ब्लाऊज सुरभीने परिधान केला आहे. हल्ली नऊवारी साडीवर डिजाईनर ब्लाऊजची अधिक फॅशन दिसून येतेय. तसंच या ब्लाऊजमुळे साडीचा साज अधिक वाढतोय. हाताला साईड सर्कल देण्यात आले आहे. हा मराठमोळा लुक अत्यंत आकर्षक दिसत आहे. तुम्हीही सुरभीप्रमाणे हा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी...; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

(वाचा – ‘चिंब भिजलेले रूप सजलेले’, ऐश्वर्या नारकरचे विशीतील तरूणींनाही लाजवेल असे रूप)

कुंदन ज्वेलरीचा साज

कुंदन ज्वेलरीचा साज

या नऊवारी साडीसह सुरभीने बॉर्डरला मॅच होणाऱ्या अशा खड्यांची कुंदन ज्वेलरी निवडली आहे. मोठा गळाभर नेकलेस आणि हेव्ही झुमके घालून हा लुक पूर्ण केला आहे. या दागिन्यांमुळे रॉयल लुक प्राप्त झाला आहे. तर परफेक्ट मॅच असे हे दागिने अधिक सुंदर दिसत आहेत.

(वाचा – सगळीकडे फक्त प्राजक्ता माळीच्या लुकची हवा, चाहते म्हणतात ‘अस्सल मराठी सुंदरी आहेस तू’ )

नथीचा नखरा

नथीचा नखरा

पूर्वी मराठमोळ्या परंपरेनुसार, मोठी नथ घालण्यात येत होती. आता पुन्हा एकदा हा नथीचा नखरा सुरू झालेला दिसून येत आहे. संपूर्ण नाकभर अशी ही भारदस्त नथ उठून दिसत आहे. लाल, हिरवे खडे असणारी ही गोल्डन नथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अशीच ठुसठुशीत नथ तुम्ही गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला घालू शकता.

(वाचा – ४८ व्या वर्षी करिष्मा कपूरपुढे तरूण मॉडल्स फिक्या, बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅम लुकने केले क्लीन बोल्ड)

भाळी चंद्रकोर शोभे

भाळी चंद्रकोर शोभे

हा लुक पूर्ण आणि उठावदार झालाय तो ठसठशीत चंद्रकोर लावल्यामुळे. सुरभीने लावलेली चंद्रकोर पुन्हा एकदा राजेरडवाड्यांच्या काळातील स्टाईलची आठवण करून देत आहे. चंद्रकोर ही मराठमोळ्या स्टाईलची शान आहे आणि तीच शान सुरभीने कॅरी केलेली दिसून येत आहे.

हेही वाचा :  'सगळं आताच उघड केलं तर...'; खासदारकीच्या तिकीटाबद्दल बोलताना उदयनराजेंचे सूचक मौन

आंबाड्याची मराठमोळी स्टाईल

आंबाड्याची मराठमोळी स्टाईल

यासह आंबाड्याची स्टाईल करून सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. तर सुरभीने या स्टाईलसह मॅट मेकअप केला आहे. ड्युई मेकअप बेस त्यासह साडीला मॅच होणारे कोहल आईज, डार्क आयब्रोज आणि गुलाबी रंगाची डार्क लिपस्टिक शेड लावत तिने हा लुक पूर्ण केला आहे. एकंदरीतच सुरभीच्या लुकवरून नजर हटत नाहीये.
गुढीपाडव्याच्या लुकसाठी तुम्ही सुरभीच्या या रॉयल लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …