OYO चे मालक रितेशच्या बायकोला लाल साडीत बघून रोखल्या नजरा,अब्जाधिश असून जिंकले साधेपणाने मन

इंडियन हॉस्पिटॅलिटी फर्म OYO CEO Ritesh Agarwal यांनी फॉर्मेशन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका geetansha sood यांच्याशी ७ मार्च रोजी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. रितेश आणि गीतांशा यांनी एका खाजगी समारंभात एकमेकांना वचने देत सात फेरे घेतले होते. त्यानंतर या जोडप्याने दिल्लीतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे भव्य रिसेप्शन देखील आयोजित केले. या समारंभाला Paytm CEO Vijay Shekhar Sharma यांच्यापासून Lenskart CEO Peyush Bansal, Flipkart CEO Kalyan krishnamurthyआणि Softbank CEO Masayoshi Son यांच्यापर्यंत देश, जग आणि कॉर्पोरेट जगतातील मोठमोठ्या हस्तींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.

एवढेच नाही तर Shark Tank India Judges Aman Gupta हे सुद्धा नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या लवी-डवी स्टनिंग पत्नीसह पोहोचले होते. पण उपस्थित अनेक ग्लॅमरस स्त्रियांपेक्षाही खास ठरला तो म्हणजे लालभडक साडीतील वधुचा लुक, ज्याकडे सर्वांच्याच नजरा वळून वळून रोखल्या जात होत्या. आपल्या आयुष्यातील खास दिवसासाठी गीतांशा यांनी आऊटफिट सुद्धा खासच निवडले होते. (फोटो सौजन्य -@boatxaman/@mukesh_prometheus इंस्टाग्राम)

बनारसी साडीने केलं मंत्रमुग्ध

बनारसी साडीने केलं मंत्रमुग्ध

लखनऊ गर्ल असणाऱ्या गीतांशा सूदने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी चमकदार लाल रंगाची साडी निवडली होती, जी तिचा ब्राईडल लुक चांगलाच खुलवत होती. या डिझाईनर साडीवर ओव्हरऑल गोल्डन कलरने सीक्वन वर्क केले होते. हे ब्राईडल आऊटफिट बनवण्यासाठी बनारसी सिल्कचा वापर केला गेला होता, ज्यामुळे त्यात साधेपणा होताच पण त्याचा थाट अगदी उंची होता. एकंदर आऊटफिटवर मुघल एम्पायरच्या वेळचे जबरदस्त असे सुंदर ट्रेडिशनल वर्क केलेले दिसत होते आणि हेच या आऊटफिटचे वैशिष्ट्य ठरले. या साडीने नवरीच्या लुकला चार चॉंद लावले.

हेही वाचा :  हळदीचा कार्यक्रम रंगात असतानाच बिग बॉस फेम दादुसने थेट बंदुक काढली अन्...; VIDEO व्हायरल

(वाचा :- तेच तारूण्यातील तेज अन् कातील स्टाईल, 71 वर्षाच्या zeenat Aman च्या रॅंपवॉकपुढे विशीतल्या अभिनेत्री पार फिक्या)​

साडीवर हाताने केले होते ट्रेडिशनल एम्ब्रॉईडरी

साडीवर हाताने केले होते ट्रेडिशनल एम्ब्रॉईडरी

वधू गीतांशा सूदच्या साडीवर आर्टिस्टिक एम्ब्रॉइडरी केलेली दिसून आली. ज्याच्या बेससाठी शाइनी मटेरियल आणि डेलिकेट थ्रेड्सचा वापर करण्यात आला होता. पूर्ण साडीला प्रिस्टन गोल्डन जरीच्या धाग्यांनी आणि हेवी स्टोनने सजवण्यात आले होते. डिटेल डिजाईन आणि साॅफेस्टिकेटेड लुकमुळे ही साडी खरंच आकर्षक दिसत होती. याशुवाय वधूने या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज घातला होता, ज्यामध्ये लो-कट नेकलाइन आणि हाफ स्लीव्हज होते. ब्लाउजवर हँड मॅग्गम वर्क देखील होते, जे मोनोटोन लुकमुळे नजर खेचून घेत होते.

(वाचा :- अमरिश पुरीचा नातू वर्धन पुरी दिसतो स्टड मुंडा,देशी असो वा विदेशी प्रत्येक लुक जबराट कातील, लाखो मुली आहेत फिदा)​

ज्वेलरी होती खास

ज्वेलरी होती खास

यात शंका नाही गीतांशा सूदचा एकूण लुक असा होता की ती अगदीच भाव खाऊन गेली आणि तरुणींसाठी तर हा ड्रीम ब्राईडल लुक ठरला. पण तिच्या या लुकला जबरदस्त बनवण्यात तिच्या ज्वेलरीचे देखील मोठे योगदान होते. मॅचिंग ज्वेलरी ऐवजी तिने घातलेल्या कॉन्ट्रास्टिंग ज्वेलरीमुळे तिचा लूक आणखीनच सुंदर झाला. गीतांशाने या डार्क रेड कलरच्या साडीसोबत सोन्याचे दागिने घातले होते, ज्यात जडाऊ चोकर नेकलेससोबतच कानातले आणि हातात बांगड्यांसोबतच अंगठ्यांचा समावेश होता. त्याचवेळी, तिने तिच्या चेहऱ्यावर सुपर चिक मेकअप केला होता आणि केस बनमध्ये स्टाईल केले.
(वाचा :- शार्दुल ठाकूरनंतर आणखी एका ऑलराऊंडर क्रिकेटरची विकेट, नवरीच्या लोभस रूपाने छेडली चाहत्यांच्या काळजाची तार..!)​

हेही वाचा :  'संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

रितेशही दिसला खास

रितेशही दिसला खास

देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक असलेल्या रितेश अग्रवालनेही आपल्या लग्नासाठी सर्वोत्तम आऊटफिट निवडले होते. त्याने आपल्या नवरीच्या लुकला कंट्रोस्ट करत काळ्या रंगाचा बंद गळा सूट घातला होता, ज्यामध्ये तो अतिशय देखणा आणि राजबिंडा दिसत होता. त्याचवेळी, त्याने पायात जोधपुरी शूज घातले होते, ज्यामुळे त्याचा लूक खूपच स्टायलिश दिसत होता. बरं, नवरा-नवरी दोघांचाही लूक असा होता की त्यांच्यासमोर आलेल्या पाहुण्यांपैकी देखील कोणीच भाव खात नव्हते.

(वाचा :- शॉर्ट पॅंट-कॉफी कलरच्या टॉपमधील कृती सेननच्या अदांची इंटरनेटवर आग,लचकत-मुरडत पडली बाहेर अन् लोकांची नजरच हटेना)​

साधेपणाने जिंकले मन

साधेपणाने जिंकले मन

आता इतक्या गडगंज श्रीमंत असलेल्या रितेशचं लग्न म्हटल्यावर दिसणं, नटणं-थटणं आणि खाण्यापिण्यावर तर खर्च होणारच, यात काहीच नवल नाही. त्यामुळे वधु-वर दोघेही केवळ स्टायलिश लुकने आलेल्या पाहुण्यांची लाईमलाईटच हिरावून घेत नव्हते, तर त्यांच्या साधेपणाने उपस्थितांचे मन देखील जिंकून घेतले. या दोघांनी सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सोन यांच्या पायाला स्पर्श करताच उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच त्यांनी मन जिंकले.
(वाचा :- डीपनेक ब्लाऊज – वाईन रेड लेहंग्यातील न्यासा देवगणच्या अदांनी केलं पार घायाळ, चाहते म्हणाले, तू तर काजोलचीच झलक)​

हेही वाचा :  Maharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …