Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शीतल म्हात्रेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी केलं भाष्य, म्हणाले “इतका घाणेरडा, गलिच्छ….”

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या एका व्हिडीओवरुन (Viral Video) राज्यात गदारोळ माजला आहे. शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी ठाकरे गटावर (Thackeray Faction) आरोप केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनीच व्हिडीओशी छेडछाड करत व्हायरल केल्याचा शीतल म्हात्रेंचा दावा आहे. दरम्यान याप्रकरणी आता आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे. राज्यात जनतेचं सरकार आहे की मोघलांची सल्तनत आहे अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामधअये ठाकरे गटाचे नेते साईनाथ दुर्गे यांचाही समावेश आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. चौकशीनंतर रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटकेच्या या कारवायांवर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. 

“जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या तरुण मुला, मुलींचं भविष्य उद्धवस्त केलं जात आहे. त्यांना दमदाटी करायची, भितीचं वातावरण निर्माण करायचं हा घाणेरडा गलिच्छ प्रकार सुरु आहे. त्या मुलांनी काय गुन्हा केला आहे हा विषय आहेच. कोर्ट बोलत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई का करत आहेत? रात्रीच्या वेळीच अटकेची कारवाई का केली जात आहे?,” अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. 

हेही वाचा :  VIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला... पाहा पुढे काय झालं?

Sheetal Mhatre : शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ मी 10 जणांना फॉरवर्ड केला आणि… ठाकरे गटाच्या नेत्याचे धक्कादायक विधान

 

“एका मंत्र्याने महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या दिल्या, त्यांची हकालपट्टी का झाली नाही? सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर तिथे कारवाई का नाही केली?  राज्यात दुटप्पीपणा सुरु आहे. राज्यात जनतेचं सरकार आहे की मोघलांची सल्तनत आहे? हे धरपकड करणारं हुकुमशाही सरकार आहे. हे सरकार आता संविधान बदलेल का असं वाटू लागलं आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. 

“आर्थिक बोझा वाढणार आहे किंवा बजेटवर भार वाढेल अशी चर्चा आहे. पण अर्थसंकल्पात काही अर्थ नव्हता. निवडणुकीच्या दृष्टीने लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी सर्व घोषणा होत्या. डबल इंजिन सरकार असताना एक इंजिन सतत फेल का होत आहे?,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. सरकार जोपर्यंत लोकांच्या विषयाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असंही ते म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …