औषधं व डॉक्टविनाच युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होतो छुमंतर

Uric Acid हे एक केमिकल आहे जे शरीरात तयार होते. जेव्हा आपण प्युरीन असलेले पदार्थ खातो तेव्हा त्यांच्या पचनाच्या वेळी या घाणेरड्या केमिकलची निर्मिती होते. हा पदार्थ पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि शरीरात खूप जास्त वाढल्यानंतर अनेक समस्या निर्माण करू लागतो. रक्तात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असणे याला Hyperuricemia म्हणतात, ज्यामुळे संधिवात आणि Kidney Stone अर्थात मुतखडा देखील तयार होतो.

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने सांधेदुखी, सूज, मळमळ, वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. या युरीक अ‍ॅसिडपासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे फार कमी लोकांना माहित आहे आणि तिच माहिती देण्याचा प्रयत्न आज आम्ही या लेखातून करत आहोत. चला तर जाणून घेऊया काय आहे कशा पद्धतीने तुम्ही या युरीक अ‍ॅसिडशी सामना करू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

औषधांशिवाय यूरिक अ‍ॅसिड कमी करणे

औषधांशिवाय यूरिक अ‍ॅसिड कमी करणे

Pubmed वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जर तुम्हाला औषधांशिवाय शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकायचे असेल, तर जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही असे व्यायाम करायला सुरुवात करा, जे जास्त ताण न देता वजन कमी करण्यास मदत करतात. कारण, लठ्ठपणामुळे युरिक अ‍ॅसिड खूप वेगाने वाढते.
(वाचा :- बापरे,मुंबईवर H3N2 virus ची सावली, सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्यात, डॉक्टरांचे हे 6 उपायच वाचवू शकतात जीव)​

हेही वाचा :  डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब... वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

स्विमिंग करणे

स्विमिंग करणे

हायपरयुरिसेमियाला नियंत्रित ठेवण्यासाठी स्विमिंग करणे हा एक उत्तम उपाय आहे, ज्यामुळे कसरत होते आणि माइंड सुद्धा फ्रेश होते. रोज स्विमिंग केल्याने शरीराचे संतुलन सुधारते. शिवाय पोहण्यामुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते.

(वाचा :- Reduce Blood Sugar : इन्सुलिनने खचाखच भरली आहेत आंब्याची पानं, असा करा वापर, गोड खाऊनही होणारच नाही डायबिटीज)​

सायकल चालवणे

सायकल चालवणे

सायकल चालवण्यासारखा दुसरा जबरदस्त व्यायाम नाही. सायकल चालवताना मजा तर येतेच पण संपूर्ण शरीराची हालचाल सुद्धा होते. म्हणूनच जाणकार सुद्धा सांगतात की, सायकलिंग ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हा एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे स्नायूंवर जास्त ताण पडत नाही. ज्यांना जास्त यूरिक ऍसिडचा त्रास आहे, त्यांनी दररोज काही वेळ सायकल चालवली पाहिजे.
(वाचा :- Colorectal Cancer Signs : टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा कॅन्सर)​

चालणे

चालणे

सर्वात सोप्पा व्यायाम कोणता तर तो आहे चालणे. चालण्याची शारीरिक क्रिया करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साधनांची किंवा विशेष सुविधांची आवश्यकता नाही. हा व्यायाम तुम्ही घराबाहेर, टेरेसवर, उद्यानात किंवा घराच्या आत कुठेही करू शकता. रोज चालल्याने युरिक अॅसिड कमी करण्यासोबतच हृदयविकार आणि लठ्ठपणाही दूर केला जाऊ शकतो.

हेही वाचा :  Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का?

(वाचा :- Rapper Badshah Weight Loss रॅपर-गायक बादशाहला या 4 समस्यांमुळे करावं लागलं वेटलॉस, या आजारात थांबतो थेट श्वासच)​

ह्या फुड्स पासून बनते युरिक अ‍ॅसिड

ह्या फुड्स पासून बनते युरिक अ‍ॅसिड

आता तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल की युरिक अ‍ॅसिड निर्माण होण्याला कोणते फुड्स कारणीभूत आहेत? तर मंडळी,

  1. सी फुड्स
  2. दारू
  3. प्राण्यांचे लिव्हर
  4. आइस्क्रीम
  5. सोडा
  6. फास्ट फूड

यांसारखे पदार्थ शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्ही यांचे सेवन करा पण मर्यादित प्रमाणातच!
(वाचा :- H3N2 Virus चिंता वाढली, करोनानंतर एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू,झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …