घरात घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स

How To Make Curd At Home: दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. यामुळेच रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करण्यात येतो. काही जण दही घरीच तयार करतात तर अनेक जण बाजारात तयार मिळणारे दही वापरतात. अनेकांना घरात दही लावता येत नाही. मात्र तुम्हाला बाजारातील दह्याप्रमाणे घट्ट आणि गोड दही घरीच तयार करायचे असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा करा वापर.

दही बनविणे तुमच्यासाठीही होईल सोपे जर आम्ही सांगितलेली पद्धत तुम्ही अवलंबली. बाजारातील दही खाण्यापेक्षा घरातच दुधाचे दही बनविणे आता अधिक सहज आणि सोपे होईल. जाणून घ्या पद्धत (फोटो सौजन्य – iStock)

कसे लावावे दही

कसे लावावे दही

घरी दही बनविण्याची सर्व जुनी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे दुधाने सुरूवात.

  • सर्वात आधी तुम्ही अर्धा लीटर दूध घ्या
  • हे दूध गॅसवर व्यवस्थित उकळून घ्या
  • ही दुधाची प्रक्रिया संपल्यानंतर तुम्ही दूध थंड होण्याची वाट बघा
  • त्यानंतर रात्री तुम्ही एका मातीच्या भांड्यात अथवा स्टीलच्या भांड्यात दूध घ्या आणि त्यात अगदी दोन – तीन थेंब ताक अथवा दह्याचे थेंब घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा
  • त्यानंतर हे दूध गॅसजवळ ठेवा अथवा रूम टेंपरेचर असेल अशा ठिकाणी झाकून ठेवा
  • एकदा दही मिक्स केल्यानंतर दुधात पुन्हा पुन्हा ढवळाढवळ करू नका अन्यथा दही घट्ट लागणार नाही
हेही वाचा :  ४० व्या वर्षात मिळेल Teenager Look, मेकअप करताना वापरा या सोप्या टिप्स

या पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी घट्ट दही तयार झालेले तुम्हाला दिसेल. तसंच दही आंबटही होणार नाही.

फ्रिजचा करू नका वापर

फ्रिजचा करू नका वापर

काही जण सकाळी दही लागल्यावर त्वरीत फ्रिजमध्ये ठेवतात. पण दही ताजे असेल तर ते लगेच फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे दह्याला पाणी सुटते. साधारण ७-८ तास दही लावल्यावर झाले असतील तरच त्यानंतर दही फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दही घट्ट राहील.

(वाचा – होळीसाठी बनवा कटाची आमटी सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद)

असे लागेल लवकर दही

असे लागेल लवकर दही

तुम्हाला लवकर दही तयार करून हवे असेल तर तुम्ही ओव्हन अथवा मायक्रोवेव्हची मदत घ्या.

  • गॅसवर दूध गरम करून घ्या
  • त्यानंतर दूध थंड होऊ द्या
  • त्यात दही मिक्स करून झाका
  • त्यानंतर मायक्रोवेव्ह चालू करून १८० डिग्रीवर साधारण २ मिनिट्स प्री-हिट करा आणि मग स्विच बंद करा
  • यामुळे दही लवकर लागण्यास मदत मिळते

(वाचा – साबुदाण्याच्या खिचडीचा लगदा होऊन चिकटतेय का? अशी बनवा मोकळी खिचडी, सोप्या टिप्स )

कधी खावे दही?

कधी खावे दही?

तुम्हाला दही खायला आवडत असेल तरीही कोणत्याही वेळी दही खाणे योग्य नाही. सकाळी वा दुपारी जेवणाच्या वेळी दही खाऊ शकता. अन्न पचविण्यासाठी याचा फायदा होतो. रात्री दही खाल्ल्याने अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसंच दुधासह दही कधीच खाऊ नये. ताप असताना दही वर्ज्य करणेच योग्य ठरेल.

हेही वाचा :  जोधा अकबरच्या ऐश्वर्यापासून कियारा अडवाणीपर्यंत, या वेडिंग सीझनला ग्लॅमरस लूकसाठी आयडियल ठरतील हे ५ लूक

(वाचा – तळलेल्या पुरीत दिसतंय तेल? ऑईल फ्री पुरी दिसण्यासाठी वापरा कमालीच्या ट्रिक्स)

दही खाण्याचे फायदे

दही खाण्याचे फायदे

दही खाण्याने हाडे मजबूत होतात, कारण यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे

  • दह्यापासून शरीराला प्रोटीन मिळते
  • पचन योग्य होण्यासाठी दही फायदेशीर ठरते
  • दही खाण्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि स्टॅमिनाही चांगला होतो
  • दह्यामुळे गॅस आणि जळजळीपासून सुटका मिळते
  • शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मिळते मदत
  • दही हे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते

रोज बाहेरचे दही खाण्यापेक्षा घरात दही तयार करून खाणे अधिक फायदेशीर ठरते. तसंच घरातील तयार दह्याने आरोग्यही तंदुरूस्त राहाते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …