सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या हार्ट अटॅक का येतो लक्षणे अन् उपाय

Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री Sushmita Sen नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सुष्मिता तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच सुष्मिता सेनने तिच्या आरोग्यासंबंधीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे. सुष्मिता सेनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :- @@sushmitasen47, @Istock )

काय आहे ही पोस्ट

काय आहे ही पोस्ट

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने इन्स्टाग्रामवर तिच्या तब्येतिविषयी माहिती दिली. वयाच्या ४७ व्या वर्षी सुष्मिता सेन हृदयविकाराचा झटका आला या पोस्टमध्ये तीने सांगितले की ‘ मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी ‘माझं हृदय फार मोठं आहे’ असं सांगितलं. यावेळी सर्वांनी मला केलेल्या मदती बद्दल आभार. यात सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की मी आता ठणठणीत आहे. पुन्हा नव्या जोमाने आपले आयुष्य जगायला तयार आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.

हेही वाचा :  फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss

(वाचा :- Reduce Cholesterol: या 8 नैसर्गिक उपायांनी घाणेरडा कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवा, औषधांची गरज ही भासणार नाही)

चाहत्यांची प्रतिक्रिया

चाहत्यांची प्रतिक्रिया

सुष्मिता सेनची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी तिच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी ‘लवकर बरी होशील’ असे म्हणत तिला धीर दिला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेट्समध्ये पाऊसच पाडला आहे.

(वाचा :- सावधान! भारतात कॉलराचा धोका वाढला, आधी पोट बिघडणार, मग काही तासातच जीव गमवावा लागेल) ​

पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज

पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज

गेल्या दहा वर्षातील पाच वर्षे चांगली गेलीत. पण, पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत आहे. गेली पाच वर्षे माझ्या जीवनात अंधार आहे. पण माझ्या आयुष्यात आशेचा एक किरण आला आहे.

(वाचा :- Ways to Reduce Uric Acid: ना औषध, ना पथ्यपाणी फक्त या 8 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड रक्तातूनच खेचून वेगळे होईल)

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

हृदयविकाराचा झटका येण्याच्या मुख्य कारणांमध्ये आयुष्यातील वाढता ताण जबाबदार असतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाचे स्वरूप बदलल्याने नवनव्या ताणांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :  लघवीत हा रंग दिसणं म्हणजे किडनीच्या कॅन्सरची सुरूवात? डॉ. सांगितली किडनीच्या कॅन्सरची 10 ठोस लक्षणं, व्हा सावध

हृदयावरील ताण वाढत असल्याने एका मर्यादेपलीकडे तो असह्य होऊन हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय वंशपरंपरेमुळेही हृदयविकाराचा त्रास जडतो. त्याचप्रमाणे अपुरी झोप हे देखील त्याचे कारण असू शकते.

या कारणांमुळेही येतो हृदयविकाराचा झटका

या कारणांमुळेही येतो हृदयविकाराचा झटका
  • फास्ट फूडचे अतिसेवन
  • उच्च रक्तदाबाचा त्रास
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढ
  • मधुमेहाचा त्रास
  • आधुनिक जीवनशैलीच जबाबदार आहे.

हृदयविकाराची लक्षणे

हृदयविकाराची लक्षणे

कोणताही आजर आपल्याला पटकन होत नाही. आपले शरीर त्याची लक्षणे आपल्याला अधीच देत असते. हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देत असते.या संकेतांमध्ये छातीत दुखणे वा छातीच्या आसपास अचानक दुखणे, जडत्व येणे, हात-पाय, पोट, पाठ आणि घसा यांच्यात वेदना सुरू होणे, श्वसनास त्रास जाणवणे, खूप घाम येणे, मळमळणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.

(वाचा :- Shark Tank India च्या विनीता सिंगला आला Panic Attack,अशा परिस्थितीत घाबरून जाण्यापेक्षा या ८ गोष्टी करा)

हृदयविकार टाळायचा असेल तर या गोष्टी करा

हृदयविकार टाळायचा असेल तर या गोष्टी करा
  • हृदयविकार टाळण्यासाठी आहार नियमित असणे गरजेचे असते.
  • दररोज व्यायाम आवश्यक असतो
  • तणावमुक्तीसाठी योगसाधना करावी
  • फास्ट फूट शक्यतो टाळावे
  • आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश अधिकाधिक असावा
हेही वाचा :  Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …