बॉयफ्रेंडला लागले दुसऱ्या बाईचे वेड, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं!

प्रश्न: मी 28 वर्षांची अविवाहित महिला आहे. गेले दोन वर्षांपासून मी एक मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आमच्यात सर्व काही ठिक चालू होतं. पण काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट घडली ज्याने मला खूप त्रास झाल. खरं तर, माझा बॉयफ्रेंड त्याच्या एका क्लायंटच्या प्रेमात पडला. तीने ही हो म्हटले असावे कारण त्या दिवसानंतर ती त्याला रोज फोन करू लागली. माझ्या बॉयफ्रेंडनेही तिच्यात रस घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष केले, पण हे सर्व सहन न झाल्याने मी त्या मुलीला थेट फोन केला. आणि सर्व काही सांगून टाकले.

पण ती माझ्या बॉयफ्रेंडच्या ऑफिसची एक महत्त्वाची क्लायंट होती. या गोष्टीचा परिणाम त्याच्या कामावर झाला. त्याच्या बॉसने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. माझ्या या चुकीची शिक्षा त्याला भोगावी लागली आहे. माझ्यामुळे माझ्या बॉयफ्रेंडची नोकरी गेली. मात्र, तो माझ्यावर रागावलेला नाही. या गोष्टीनंतर त्याच्या मनात नक्की काय चाललं आहे हे मला माहित नाही. आमच्यात सर्व काही ठिक होण्यासाठी मी काय करू. (फोटो सौजन्य :- @istock)

हेही वाचा :  माझी कहाणी: माझ्या आयुष्यात दोन स्त्रिया आहेत माझं दोघींवरही समान प्रेम आहे, मी कोणला निवडू

तज्ज्ञांचे उत्तर

तज्ज्ञांचे उत्तर

या समस्येवर फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान विभागाच्या प्रमुख कामना छिब्बर म्हणतात, ”तुम्हा दोघांसाठी ही परिस्थिती किती त्रासदायक असेल हे मला चांगले समजते. कारण या एका कारणामुळे तुम्हा दोघांचे नाते बिघडत चालले आहे. पण आपण कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी, प्रथम या सर्व गोष्टींमुळे तुमच्या प्रियकराला काय वाटत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या प्रकरणात त्याने काय योजना आखली आहे? त्याच्या डोक्यामध्ये सध्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- कोण आहेत मिसेस महिंद्रा? पाहताच क्षणी प्रेमात पडले आनंद महिंद्रा, आजीची अंगठी घेऊन केलं प्रपोज) ​

एकमेकांशी बोला

एकमेकांशी बोला

मला तुमच्या समस्येची चांगली जाणीव आहे. पण अशा परिस्थितीत मी तुम्हाला सांगेन की एकमेकांशी बोला. तुम्ही दोघांनी या विषयावर एकमेकांशी न बोलणे योग्य नाही. कारण तुमच्या समस्या एकमेकांशी शेअर केल्याने समस्या सुटू शकतात. त्यांना सांगा की तुम्ही त्यांना त्यांच्या समस्येत पाठिंबा देऊ इच्छित आहात. आपण त्याला विचारू शकता की तो सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे.

(वाचा :- पैशावरून संसाराची झाली राखरांगोळी, नात्यात आला दुरावा कुठे तुमच्या आयुष्यातही…) ​

हेही वाचा :  माझी कहाणी: लग्न करुन मी पुरती फसले आहे, हनिमूनच्या रात्री असे काही झाले की ऐकून हादरुन जाल

तुमची बाजू मांडा

तुमची बाजू मांडा

तुमचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यानंतर मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की जर तो तुमच्याशी बोलण्यास संकोच करत असेल तर ज्याच्याशी तो मन मोकळ करतो त्याच्याशी बोला. तुमच्यामुळे तो या परिस्थितीत अडकला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही त्यांना साथ दिली नाही तर त्यांच्यासाठी जीवनाचा समतोल राखणे खूप कठीण होऊन बसते. त्यामुळे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- ‘लग्न करणं गरजेचं आहे का ?’ प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची भन्नाट प्रतिक्रिया)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …