‘कचरा टाकताना आमच्या आया-बहिणींचं पोट दिसतं, तूच उचलून टाकायचा,’ मौलवीकडून सफाई कर्मचाऱ्याचा अपमान

मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका सफाई कर्मचाऱ्याचा अपमान करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. येथील एका मुस्लीम धर्मगुरुने सफाई कर्मचाऱ्यावर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा आरोप केला. तसंच आमच्या तरुण मुली गाडीत कचरा टाकणार नाहीत, त्यांचं पोट दिसतं. त्यामुळे तूच तो कचरा गाडीत टाकायचा अशा शब्दांत हिणवलं. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनच पुकारलं असून पोलिसांनी SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केली आहे. यादरम्यान, आरोपीने दुसरा व्हिडीओ जारी करत माफी मागितली आहे. पोलीस सध्या आरोपी धर्मगुरुला अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. 

चंदन नगरमध्ये राहणारे मुस्लीम धर्मगुरु शादाब खान यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते बोलत आहेत की, “आम्ही आमच्या बहिणी, मुली आणि वहिनींना कचरा टाकू देणार नाही. आम्ही पैसा भरतो तसंच कचऱ्याचा टॅक्सही भरतो तर तुझ्या तोंडावर (सफाई कर्मचारी) आणखी 60 रुपये मारु असं सांगू. 2 रुपयांप्रमाणे हिशोब करा. पण कचरा तू उचलून टाकशील. आमच्या बहिणी, मुली गाडीत कचरा टाकणार नाहीत”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मी पाहिलं आहे की, ज्या वहिनी, आई किंवा तरुण मुली जेव्हा कचरा टाकण्यासाठी येतात, तेव्हा त्यांचं पोट दिसतं. यावेली हे नीच नजरेने ते टक लावून पाहत असतात. विचार करा, आमच्याकडे सून, मुलगी, आईचं नखही दुसऱ्या व्यक्तीने पाहिलेलं चालत नाही. त्यामुळे आपल्याया आपल्या घरातून याची सुरुवात करावी लागेल”.

हेही वाचा :  महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही

दरम्यान मुस्लीम धर्मगुरुच्या या विधानानंतर सफाई कर्मचारी संतापले आहेत. इंदोरला देशातील सहाव्या क्रमाकांचं स्वच्छ शहर बनवणारे हे सफाई कर्मचारी विधानामुळे दुखावले आहेत. त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत कडक कारवाईची मागणी केली आहे. तसंच वाल्मिकी समाजाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर मुस्लीम धर्मगुरुने दुसरा एक व्हिडीओ जारी करत माफी मागितली आहे. 

मुस्लीम धर्मगुरुच्या परिसरातून 2 दिवस कचरा न उचलण्याचा निर्णय

वाल्मिकी समाजाचे मनोज परमार यांनी म्हटलं आहे की, फक्त माफी मागून भागणार नाही. त्यांचं घर पाडलं पाहिजे. आम्ही त्यांच्या तोंडावर 60 हजार रुपये फेकू शकतो. त्याला माफ करणार नाही. ही आमच्या समाजाचा अपमान आहे. 

इंदोरनध्ये स्वच्छता सर्व्हेक्षण सुरु असल्याने आपण शहराची बदनामी होऊ नये यासाठी पूर्णपणे काम बंद करणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पण 2 दिवस काम बंद असेल. तसंच मुस्लीम धर्मगुरुच्या परिसरातील कचरा उचलणार नसल्याचं सांगितलं आहे. 

हेही वाचा :  कल्याणमध्ये विधवा महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या; आरोपी इतरांचे फोन वापरत देत होता चकवा, पण अखेर पोलिसांनी गाठलं | Kalyan Police has arrested accused from Igatpuri in murder case of widow sgy 87



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …