CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा…

Hyderabad cardiac arrest Videoगेल्या काही दिवसांपासून विचित्र व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अचानक मृत्यूने कवटाळल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. त्यामुळे धडधाकट व्यक्तीला अचानक काय झालं? असा सवाल आता अनेकांनी उपस्थित केला आहे. अशातच आता हैदराबादमधील एक व्हिडिओ (Hyderabad Video) सध्या धुमाकूळ घातलाना दिसतोय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. (hyderabad based constable suffers from cardiac arrest died on the spot at gym while doing exercise)

हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल नावाच्या या हवालदारासोबत ही घटना घडली. नेहमीप्रमाणे विशाल सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी वॉम अप (Exercise) सुरू केला. थोड्याच वेळात त्यांनी नियमित व्यायाम सुरू केला. पुशअपस केले. व्यायाम पूर्ण होत असताना स्ट्रेचिंग सुरू केली.

स्ट्रेचिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना काहीतरी अस्वस्थता जाणवली. त्यावेळी अचानक विशाल खाली पडले. त्यावेळी शेजारी उभा असलेल्या व्यक्तीने त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ट्रेनर देखील पळत आला अन् त्याने लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, विशालला हृदयविकाराचा तीव्र (Cardiac Arrest) झटका आला आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला.

हेही वाचा :  iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...

पाहा Video – 

व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका – 

यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. अनेकदा अशा समस्या जाणवू लागतात. त्यामुळे व्यायाम करताना योग्य (cardiac arrest causes) काळजी घेणं गरजेचं आहे.

आणखी वाचा – Viral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण

दरम्यान, अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला सडन कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता असते. त्याला अचानक आलेला हृदयविकाराचा झटका (cardia arrest vs heart attack) असं म्हटलं जातं. त्यामुळे नियमित झोप घेतली असेल तरच व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

हेही वाचा :  'ही वस्तुस्थिती आहे की...'; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …