MHADA Lottery For Mill Workers : गिरणी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, सदनिकेसाठी मुदतवाढ

Mhada lottery for mill workers 2020 : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे  गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती (Mhada lottery for mill workers 2022).  या लॉटरीत यशस्वी ठरलेले 144 गिरणी कामगार तसेच त्यांचे वारसदार यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी 8 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  55 लाभार्थ्यांनी त्यांचे तात्पुरते देकार पत्र बँकेतून घेऊन जाण्याचे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.  

गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे  मार्च 2020 रोजी 3894 सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. या  संगणकीय सोडतीतील यशस्वी पात्र 1369 गिरणी कामगार/वारसांपैकी 1331 गिरणी कामगार/वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी तात्पुरते देकार पत्राची प्रत (Provisional Offer Letter) ऑनलाईन मोबाईलवर पाठविण्यात आली आहे. त्यापैकी सदनिकेच्या विक्री किंमतीच्या 10 टक्के रकमेचा पहिला हप्ता न भरलेल्या 114 लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा

पहिला हप्ता भरण्यासाठी 8 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप तात्पुरते देकार पत्र प्राप्त न घेतलेल्या 55 लाभार्थ्यांनी  मूळ टोकन जमा करून बँकेतून तात्पुरते देकारपत्र प्राप्त करून घ्यावे,असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे.          

हेही वाचा :  Sajay Raut On Devendra Fadanvis: "...तर पुराव्यासह येऊन भेटतो", संजय राऊत यांनी लिहिलं थेट फडणवीसांना पत्र!

मुंबई मंडळाच्या गिरणी कामगारांच्या  संगणकीय सोडत प्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मंडळाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन तात्पुरते देकारपत्राची प्रत पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संगणकीय सोडत प्रणालीतील बदलानुसार यशस्वी पात्र गिरणी कामगारांनी मंडळाकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर मंडळातर्फे लिखित संदेश (Text Message) पाठविण्यात आले. या संदेशात तात्पुरते देकार पत्राची प्रत डाउनलोड करावयाची लिंक मोबाईलवर पाठविण्यात आली. या लिंक वरून पात्र उमेदवार स्मार्ट फोनवरून देकार पत्राची प्रत डाउनलोड करु शकतात. 

सुमारे 1200 गिरणी कामगारांना तात्पुरते देकार पत्र बँकेतून घेऊन सदनिकेच्या विक्री किंमतीचा 10 टक्के भरणा केला आहे. तसेच उर्वरित 90 टक्के रकमेचा दुसरा हप्ता भरून एकूण 25 लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. लॉटरी जिंकलेल्या 114 आणि 55 गिरणी कामगारांच्या नावांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या यादीतील नावे तपासून लाभार्थ्यांनी तात्पुरते देकार पत्र मुंबै बँकेच्या फोर्ट शाखेतून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के व ९० टक्के रकमेचा भरणा विहित मुदतीत करावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करताना प्रती व्यवहार  35.40 रुपये अतिरिक्त शुल्क भरणे गरजेचे आहे. सदर शुल्काचा भरणा केला जात नसल्याने लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा 10 टक्के भरणा करण्याची प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. 
प्रत्येक गिरणी कामगारांचे तात्पुरते देकार पत्र सिस्टिम जनरेटेड असून लाभधारकास मिळणाऱ्या पत्रावर त्यांचा स्वतंत्र बँक खाते क्रमांक (Virtual Account Number) नमूद करण्यात आला. नमूद बँक खात्यावर त्यांनी आपल्या गाळ्याच्या विक्री किंमतीचा भरणा NEFT/RTGS द्वारे करावयाचा आहे.  

हेही वाचा :  “देशात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार,” रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

यापूर्वी गिरणी कामगारांच्या सदनिका सोडतीसाठी तात्पुरते देकार पत्र पोस्टाद्वारे पाठवले जायचे. पत्ता चुकीचा असल्यास अथवा पत्र वेळेवर न मिळाल्याच्या कारणांनी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मंडळाच्या कामकाजात देखील अडथळे निर्माण होत होते. परंतु, तात्पुरते देकारपत्राची प्रत ऑनलाईन पाठविण्याच्या सुविधेमुळे गिरणी कामगार/वारस यांना घरबसल्या तात्पुरते देकार पत्र जारी झाल्याची आगाऊ सूचना प्राप्त होत आहे.  तात्पुरते देकार पत्राची प्रत ऑनलाईन मिळाल्याच्या तारखेपासून 105 दिवसांच्या आत 10 टक्के रक्कम 45 दिवसांच्या आत तर उर्वरित 60 टक्के रक्कम 60 दिवसात भरावयाची आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …