बिकिनी वॅक्समुळे खरंच योनीमार्गाची स्वच्छता होते का? डॉक्टरांनी सांगितले सत्य

शरीराची स्वच्छता ही आरोग्यासाठी कायमच महत्वाची ठरते. पण असं करत असताना आपण चुकीची गोष्ट तर अवलंबत नाही ना? हे तपासून घेणेही तितकेच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘बिकिनी वॅक्स’चा ट्रेंड सुरू झालाय. कधी फॅशन म्हणून तर कधी शरीर स्वच्छतेच्या नावाखाली योनी मार्गावर वॅक्स केला जातो. पण हे वॅक्स करणे कितपत योग्य आहे हे आपण अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ राणा चौधरी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. (फोटो सौजन्य – iStock)

बिकिनी वॅक्स म्हणजे काय?

बिकिनी वॅक्स म्हणजे काय?

बिकिनी वॅक्स म्हणजे योनी मार्गातील केस अन् केस वॅक्सच्या मदतीने काढून टाकणे. हल्ली बाजारात वेगवेगळे प्रकारचे इरेझर किंवा बिकिनी इरेझर देखील उपलब्ध होतात. याने योनी मार्गावरील सर्व केस उपटून काढले जातात.

​वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

मग काय करावं?

मग काय करावं?

योनी मार्गातील केस उपटून टाकणे ही पद्धतच मुळात चुकीची आहे. योनी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. कारण योनी मार्ग स्वतःची काळजी स्वतः घेतो. पण अगदीच त्रास होत असेल तर ग्रुमिंग करणे किंवा कात्रीने केस कमी करणे हे करू शकता. असं करताना तुम्ही स्वतःली इजा होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  फक्त मोबाइलच नाही तर, Laptop मध्येही सेट करता येते Face lock , फॉलो करा या स्टेप्स

​ (वाचा – बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती)​

योनी मार्गाची स्वच्छता कशी होते?

योनी मार्गाची स्वच्छता कशी होते?

योनी मार्गाची रोगप्रतिकार शक्ती ही नैसर्गिकरित्या सांभाळली जाते. यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन बॅक्टेरिया असतात. हे एकमेकांच्या मदतीने योनी मार्गाचे आरोग्य सांभाळतात. त्यामुळे यासाठी कोणतेही अनैसर्गिक प्रयत्न करणे चुकीचे ठरते.

(वाचा – पुरूषांना हळूहळू आतून पोकळ बनवतोय हा आजार, ५ गोष्टींपासून आताच व्हा दूर)

इंटिमेट वॉश गरजेचे?

इंटिमेट वॉश गरजेचे?

इंटिमेट वॉश हे एक सौम्य क्लीन्सर आहे जे योनिमार्गाच्या क्षेत्रास स्वच्छ करण्यासाठी केले जाते. बऱ्याच स्त्रियांना स्वतःला समजत नाही की त्यांचे योनि क्षेत्र कसे आहे. महिलांना स्वतः पहिली आपल्या आरोग्याची माहिती घेणे गरजेचे आहे. इंटिमेट वॉशमुळे तुमच्या योनी मार्गाची बाहेरची त्वचा खराब होते. यामुळे जंतू संसर्ग जास्त प्रमाणात होते.

​(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

टॅल्कम पावडर, तेल लावणे योग्य आहे का?

टॅल्कम पावडर, तेल लावणे योग्य आहे का?

टॅल्कम पावडर योनीमार्गातून आत गेल्यास त्यामुळे ओव्हरीयन कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. योनी मार्गाजवळ कोणतीही पावडर किंवा तेल लावू नये. यामुळे त्या भागाला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच परफ्यूम मारणे देखील चुकीचे आहे. योनी मार्ग पाण्याने स्वच्छ करणे हा उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा :  चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या...

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)

डॉक्टरांची प्रतिक्रिया

डॉक्टरांची प्रतिक्रिया

योनी मार्गातील भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने बिकिनी वॅक्स करुन घेणे वेदनादायक ठरते. योनी मार्गाची स्वच्छता राखणे गरजेचे असून त्याकरिता जर सतत बिकिनी वॅक्स केले तर त्यामुळे केसांची मुळे उघडी पडून त्यावर फोड येतात, खाज सूटते, संसर्ग होऊ शकतो. या नाजूक भागाची स्वच्छता राखण्याकरिता साध्या पाण्याने हा भाग धुवून घ्यावा.
योनीमार्गातील केस हे संपूर्ण योनीमार्गाचे संरक्षण करतात त्यामुळे बिकिने वॅक्सने हे सगळे केस काढून टाकल्यास चटकन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता तुम्ही कात्रीने केस ट्रिम करु शकता. ट्रिम करताना त्वचेच्या अधिक जवळ जाऊ नका कारण चुकून त्वचा कापण्याची शक्यता असते. व्हजायनल हेअर केवळ कमी करा केसांना अगदी मुळापासून कापू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.

​(वाचा – पोटात नाही, आतड्याला चिकटतात हे जंत, रक्ताचा प्रत्येक थेंब शोषतील, AIIMS ने सांगितले ६ भयंकर लक्षणे)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …