‘मन उडू उडू झालं’ फेम नयनची ‘फॅट टू फिट’ जर्नी, खऱ्या आयुष्यातही आहे ‘सुपर’ फॅशनेबल

‘मन उडू उडू झालं’ मालिका काहीच महिन्यांपूर्वी संपली पण असे असताना सुदधा या मालिकेची क्रेझ कमी झाली नाही. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या मालिकेतील नयन म्हणजेच अमित परबची नेगटिव्ह भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण तुम्हाला माहित आहे का अमित परबचा नयन बनण्याचा मार्ग सोपा नव्हता. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी त्याने एक स्लिम आणि फिट बॉडी मिळवली. एवढच नाही तर त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्यांना चाहत्यांच्या मनात जागा पटाकावली.
काही दिवसांपूर्वीचे अमित परबने त्याच्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्याच्या नावत बदल केला. आईवर असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी अमितने त्याचे नाव बदलून ”अमित अवंती” ठेवण्याची निर्णाय घेतला. स्टिरियोटाइप मोडून काढण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले. अमितच्या फॅशनसेन्सबद्दल बोलयचं झालं तर तो देखील खूपच चांगला आहे. तो कधी कुर्ता तर कधी फॅशनेबल कपड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:-@theamitavanti)

हेही वाचा :  सई ताम्हणकरचा फ्लोरल प्रिंन्टमध्ये जलवा, चाहते म्हणतात 'कॉटन कॅन्डी अगदी'

‘फॅट टू फिट

फॅट टू फिट

अमित परबचा नयन बनण्याचा मार्ग सोपा नव्हता. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी त्याने एक स्लिम आणि फिट बॉडी मिळवली. आईचा सपोर्ट आणि अथक प्रयत्नांनी गोलूमोलू असणारा अमित एकदम फिट झाला. सहा महिन्यात अनेक वर्षांच्या असणारा वाईट सवयी त्यांने कटाक्षाने टाळल्या.आज मागे वळून पाहताना त्याच्या आईची मेहनत आणि त्याच्या परिश्रमाचे चिज झाले असे अमित म्हणतो.

मराठमोळा लुक

मराठमोळा लुक

अमित नेहमीच वेगवेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळतो. या लुकसाठी अमितने पिंक रंगाच्या कुर्ताची निवड केली आहे. या कुर्तावर त्याने व्हाईट रंगाचा सलवार सलवाल परिधान केला आहे. त्याचप्रमाणे मोजडी आणि फेटा घालून त्याने त्याचा लुक पूर्ण केला. एखाद्या मराठमोळ्या कार्यक्रमाला किंवा लग्नाला तुम्ही असा लुक कॅरी करु शकता. साध्या या हँडलूमच्या कुर्तांची ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

मॅन इन ब्लॅक

मॅन इन ब्लॅक

तुम्हाला तर माहितच असेल की मुलं ब्लॅक रंगाच्या कुर्तामध्ये किती सुंदर दिसतात. अमितही या ब्लॅक रंगाच्या कुर्तामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ज्याप्रमाणे अमितला स्टिरियोटाइप मोडायला आवडतात त्याचे वागणं त्याच्या कपड्यांमधून ही दिसून येते.

भक्ती रसातमध्ये मग्न

भक्ती रसातमध्ये मग्न

अमित भक्ती रसातही खूपच मग्न असतो. या फोटोमध्ये अमित वृंदावनातील आहे. या फोटोमध्ये त्याने पूर्ण पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. भक्तीसरात मग्न होण्यासाठी तुम्ही देखील अमितकडून फॅशन आयडिया घेऊ शकता.

हेही वाचा :  'शिवाजी महाराज गोट्या खेळवताना दाखवणार का' विधानावर आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले "औरंगजेबाला छोटं..."

ट्राव्हल लुक

ट्राव्हल लुक

अमिताला अभिनयाप्रमाणेच ट्राव्हल करण्याचीही आवड आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या जागा xplore करत असतो. आता हेच पाहा ना गोवाला गेल्यावर अमितने प्रिंटेड शर्ट परिधान केलं आहे. यावरुन तुम्ही जेथे फिरायला जाल तिथे असणाऱ्या स्थानिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

जीम लुक

जीम लुक

आज काल अनेक जण जीमला जातात पण जीमला जातानासुद्धा अनेक जण कोणते कपजे घालायचे या विचारात असतात. तुमच्या या समस्येसाठी तुम्ही अमितकडून आयडिया घेऊ शकता. यावेळी अमितने फुल ब्लॅक रंगाचे कपडे त्याने परिधान केले होते. जीममध्ये शक्यतो डार्क रंगाचे कपडे परिधान करा यामुळे जीमकरुन आलेला घाम दिसणार नाही.

प्रिंटेड टी शर्टचा लुक

प्रिंटेड टी शर्टचा लुक

या फोटोमध्ये तुम्ही अमितला प्रिंटेड टी शर्टमध्ये पाहू शकता. साध्या या प्रिंटचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. मराठीप्रमाणेच बॉलिवूड अभिनेते देखील अशा प्रिंटचे कपडे परिधान करतात.

ब्लु ब्लॅक कॉम्बिनेशन

ब्लु ब्लॅक कॉम्बिनेशन

ब्लु ब्लॅक हे कॉम्बिनेशन एव्हरग्रीन आहे. अमितनेसुद्ध यावेळी ब्लु ब्लॅक कॉम्बिनेशन केले आहे. ऑफिसवेअरसाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी तुम्ही हा लुक कॅरी करू शकता.

रेड ब्लेझरची जादू

रेड ब्लेझरची जादू

शक्यतो मुलं रेड ब्लेझर घेण्यासाठी १० वेळी विचार करतात. पण रेड ब्लेझरवर तुम्ही व्हाईट कॅम्बिनेशन परिधान करुन तुमचा लुक पूर्ण करु शकता.

हेही वाचा :  आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ म्हणजे शरीरात बनलं भयंकर अ‍ॅसिड,मुळापासून अ‍ॅसिडिटीचा नाश करतात हे 3 सोपे उपाय

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

‘लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील (NCP) …