इतकी गोरी कशी झालीस? काजोलने रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना केलं गप्पगार

बॉलिवूडची हरहूनरी अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. वयाच्या ४८व्या वर्षात देखील काजोलचं सौंदर्याची अनेकांना भुरळ पडते. पण डस्की स्क्रिनमुळे काजोलला अनेकादा ट्रोलर्सने ट्रोल केले आहे. काजोलला तिच्या रंगाबद्दल तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. सध्या काही दिवसातांमध्ये काजोलचे सौंदर्य पाहून काजोलला तिच्या त्वचेच्या रंगावरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. काजोल पूर्वीपेक्षा अतिशय सुंदर दिसत आहे. पण अचानक झालेला हा बदल पाहून सोशल मीडियावर एक मजेदार फोटो शेअर करून काजोलने ‘गोरी कशी झालीस?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे. (फोटो सौजन्य :- @

काजोलने घेतली अशी फिरकी

काजोलने घेतली अशी फिरकी

काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजोलने संपूर्ण चेहरा काळ्या रंगाच्या मास्कने झाकला आहे. एवढच नाही तर तिने डोळ्यांना चश्मा देखील लावला आहे. या फोटोमध्ये काजोलचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. स्वतःचा हाच फोटो शेअर करत काजोलने तिच्या त्वचेच्या रंगाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा :  कंबरेत कट असलेल्या ड्रेसमध्ये मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस जलवा, तुम्हीपण म्हणाल हिच्या समोर मलायकापण पानीकम

सन टॅन वाचण्यासाठी

सन टॅन वाचण्यासाठी

हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे त्यांच्यासाठी आहे जे मला विचारतात की मी इतकी गोरी कशी झाली.” अभिनेत्रीने हाहाहा हा इमोजी देखील टाकला. काजोलच्या या पोस्टवरून स्पष्ट होते की ती तिच्या सौंदर्याची पूर्ण काळजी घेते.

त्वचेकडे काळजी घेणं आवश्यक आहे

त्वचेकडे काळजी घेणं आवश्यक आहे

वृद्धत्वानंतर त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात कारण वयानंतर त्वचेच्या नवीन पेशी तयार होणे थांबते.सुरुवातीपासूनच त्वचेची काळजी घेणे चांगले.काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, आधी ती आपल्या त्वचेची एवढी काळजी घेत नसे पण नंतर तिला समजले की आरोग्यासोबतच त्वचेकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

सीटीएम स्किन केअर रूटीन

सीटीएम स्किन केअर रूटीन

त्वचा स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे, यासाठी सीटीएम सर्वोत्तम आहे.CTM म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग.यामुळे चेहरा तर स्वच्छ राहीलच पण त्वचेपासून अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतील.

हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे

हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे

शरीर विषमुक्त करण्यासाठी आणि चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील नको असलेली द्रव्य पाहेर पडतात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; ‘इथं’ मिळणार वाघनखांचं दर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व शिवप्रेमी ज्या घोषणेची आतुरतेने वाट …

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, दर्शन घेणाऱ्या भाविकांना शिवीगाळ करत मारहाण

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वीकेंडनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाचे दर्शन …